विवाहानंतर अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवावे का?, कोर्टाचा मोठा निर्णय; कोर्ट म्हणाले…
या कलमानुसार पीडितने दिलेल्या कबुली जबाबानुसार पीडित मुलीने तिच्या इच्छेने घर सोडलं होतं. तसेच विवाह केला होता. याचिकाकर्ता 4 जून 2022पासून तुरुंगात आहे.

अलाहाबाद: विवाहानंतर (marriage) अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भलेही एखादी अल्पवयीन मुलगी आपलं घर सोडून एखाद्याशी विवाह करत असेल आणि आपल्या इच्छेने शारीरिक संबंध ठेवत असेल. मात्र, तरीही तिच्या इच्छेचं काहीही महत्त्व राहत नाही. लग्नानंतर अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवणे चुकीचे आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) न्यायाधीश राधाराणी ठाकूर यांनी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने अलिगडच्या प्रवीण काश्यप नावाच्या व्यक्तिची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. प्रवीणने एका अल्पवयीन मुलीशी विवाह केला होता. तसेच दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता. यावेळी त्यांनी सीआरपीसीच्या कलम 161 आणि 164चा हवाला दिला. या कलमानुसार पीडितने दिलेल्या कबुली जबाबानुसार पीडित मुलीने तिच्या इच्छेने घर सोडलं होतं. तसेच विवाह केला होता. याचिकाकर्ता 4 जून 2022पासून तुरुंगात आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टाला केली होती.
अलिगडच्या नहरौला खैर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दिलेल्या जन्म दाखल्यानुसार पीडितेची जन्मतारीख 10 मे 2006 आहे. तसेच ही घटना 2 जून 2022ची आहे. त्या दिवशी ही मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे तिच्या इच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही, असं कोर्टाने म्हटलं.
कोर्टाने बुधवारी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतले. त्यानंतर तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता या प्रकरणात जामीन देणं मला योग्य वाटत नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या इच्छेचा प्रश्नच उद्बवत नाही.
तिच्या इच्छेला काही महत्त्व उरत नाही. अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्या इच्छेने प्रस्थापित करण्यात आलेले शारीरिक संबंधही चुकीचेच आहे, असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.