PM Kisan 11th installment date : पीएम किसानचा 11वा हप्ता मे महिन्यात येणार; मिळणार 2000 रुपये, अशा प्रकारे तपासा तुमची स्थिती

ही योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 6000 रुपये आर्थिक मदत देण्याची चर्चा होती. हा पैसा आजही शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाच्या आधारे सरकारमार्फत मिळतो. 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2019 दरम्यान पियुष गोयल यांनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे दिले जाते.

PM Kisan 11th installment date : पीएम किसानचा 11वा हप्ता मे महिन्यात येणार; मिळणार 2000 रुपये, अशा प्रकारे तपासा तुमची स्थिती
पीएम किसानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:00 AM

नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश (Agricultural Country) आहे. येथील 70 टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल अशा योजनांवर राज्य आणि केंद्राकडून काम केलं जात आहे. त्यातीलच एक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना (PM Kisan Yojana) ही अशीच एक योजना आहे. केंद्र सरकार पीएम किसान 11 चा हप्ता लवकरच जारी करणार आहे. PM किसान 11 व्या हप्त्याच्या रिलीजच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, अहवालानुसार, 31 मे 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी जमा होऊ शकतो. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 12 कोटी 56 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा आधार मिळणार आहे. तर 11 वा हप्ता येण्यापूर्वी सरकारने ई-केवायसी (e-KYC) करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

ही योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 6000 रुपये आर्थिक मदत देण्याची चर्चा होती. हा पैसा आजही शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाच्या आधारे सरकारमार्फत मिळतो. 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2019 दरम्यान पियुष गोयल यांनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे दिले जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले आहेत. तर आता 11 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी 11,11,87,269 शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ दिला होता. त्यानंतर 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

80 टक्के शेतकऱ्यांनी केली ई-केवायसी

वेळापत्रकानुसार या योजनेचा 11वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकर्‍यांना मिळणार होता. यासाठी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. याआधी 31 मार्च ही अंतिम तारीख होती. मात्र ती वाढवून 31 मे करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे मानले जात आहे.

या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

तुम्ही लहान असो वा अल्पभूधारक शेतकरी, जर कुटुंबातील सदस्याने कर भरला असेल तर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. कुटुंबातील सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले. याशिवाय ज्यांच्याकडे शेतीयोग्य शेतजमीन आहे, सरकारी कर्मचारी आहेत ते या सुविधेचा लाभ मिळू शकत नाही.

या तारखांना हप्ते

पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देत आहे. दरवर्षी पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो.

11व्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची

  1. पायरी 1: पीएम किसान 11वा हप्ता जारी केल्यानंतर, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी, pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. पायरी 2: मुख्यपृष्ठावरून त्यांना ‘लाभार्थी स्थिती’ टॅबवर क्लिक करावे लागेल.
  3. पायरी 3: नंतर यापैकी एक पर्याय निवडा – आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक. त्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.

    पीएम किसान मोबाईल ऍप्लिकेशन

    1. पायरी 1: सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    2. पायरी 2: होमपेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या फार्मर्स कॉर्नरवरून ‘PMKISAN मोबाइल अॅप डाउनलोड करा’ वर क्लिक करा. तथापि, तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर थेट Google Play store वर जाऊन PM किसान अॅप टाइप करू शकता आणि तेथूनही ते डाउनलोड करू शकता.
    3. पायरी 3: पीएम किसान मोबाईल ऍप्लिकेशन वापरून, लाभार्थी स्वतःची नोंदणी करू शकतात, त्यांची नोंदणी आणि पेमेंट स्थिती तपासू शकतात, आधार-आधारित योग्य नाव, योजनेचे तपशील आणि हेल्पलाइन नंबर डायल करू शकतात.
Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.