पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला संबोधित करणार! रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार, जिनपिंग यांनाही भेटणार?
गलवान खोऱ्यातील सीमावादामुळे भारत चीन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता मोदी आणि शी जिनपिंग एकाच परिषदेचा भाग असल्यामुळे या परिषदेत ते एकमेकांना सामोरं जातात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला (SCO Summit) संबोधित करणार आहेत. उझबेकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची दोन दिवसांची परिषद होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार आहेत. परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही (Xi Jinping) उपस्थित राहणार आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जाते आहे. मोदी आणि जिनपिंग यांची या परिषदेत भेट होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गलवान खोऱ्यातील सीमावादामुळे भारत चीन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता मोदी आणि शी जिनपिंग एकाच परिषदेचा भाग असल्यामुळे या परिषदेत ते एकमेकांना सामोरं जातात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पाहा लाईव्ह घडामोडी : LIVE
आज पुतीन यांची भेट घेणार
पंतप्रधान नरेंद्रम मोदी हे उझबेकिस्तानमध्ये दाखलही झाले आहेत. आज ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यासोबत काही इराणच्या इब्राहिम रायसी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Prime Minister Narendra Modi arrives in Samarkand, Uzbekistan.
He will attend the 22nd Meeting of the Council of Heads of State of the Shanghai Cooperation Organization (SCO) here. pic.twitter.com/WxAOrcFX6I
— ANI (@ANI) September 15, 2022
या बैठकीत व्यापार, उद्योग, सहकार इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकत्रित विकासाच्या दृष्टीने सहकार्याने काम करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक उलाढाली करण्याच्या उद्देशाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती, पर्यटन इत्यादी क्षेत्रातील सहकार्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांनी ऑफलाईन..
दोन वर्षांच्या कोरोना महामारीत ही परिषद ऑनलाईन आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी ऑफलाईन पद्धतीने शांघार सहकार्य परिषद पार पडते आहे. या परिषदेत कोणतीही खासगी बैठक पंतप्रधान घेणार नसल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीत चीनच्या अध्यक्षांसोबत मोदी यांची बाचतीत होते का, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.