Presidential Election 2022: कोण होणार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती? पाच महिलांची नावं चर्चेत, एका मराठमोळ्या महिला नेत्याचाही समावेश, मोदींचं वजन कुणाच्या पारड्यात?’

Presidential Election 2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांचा कार्यकाळ येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासह उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Presidential Election 2022: कोण होणार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती? पाच महिलांची नावं चर्चेत, एका मराठमोळ्या महिला नेत्याचाही समावेश, मोदींचं वजन कुणाच्या पारड्यात?'
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 5:59 PM

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांचा कार्यकाळ येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासह उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या पदांसाठी पाच महिलांची नावे चर्चेत आहे. त्यात एका मराठमोळ्या महिलेच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) या पाच नावांपैकी कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चर्चेत असलेल्या नावांपैकीच एका नावावर मोदी शिक्कामोर्तब करणार की नेहमी प्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत मोदी वेगळंच नाव पुढे करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळीही अनेक नावे चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे करून मोदींनी सर्वांना बुचकळ्यात पाडलं होतं. दोन वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका (loksabha election) होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्याही निवडणुका होतील. त्यामुळे मोदी कोणती खेळी खेळतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

चर्चेत कोण कोण?

राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांची नावे चर्चेत आहेत. आजपर्यंत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद हे आदिवासी महिलेनं भूषविलेलं नाही. त्यामुळे मुर्मू आणि उईके या दोन आदिवासी महिलांपैकी एकीला राष्ट्रपतीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

मराठमोळ्या महाजन राष्ट्रपती होणार?

राष्ट्रपतीपदाच्या या चर्चेत लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचंही नाव आहे. मराठमोळ्या सुमित्रा महाजन यांचा जन्म कोकणातील चिपळून येथील आहे. इंदोरच्या जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या मध्यप्रदेशात स्थायिक झाल्या. त्यानंतर मध्य प्रदेश हेच त्यांचं कार्यक्षेत्रं बनलं. त्या इंदौरमधून 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 रोजी सलग संसदेत निवडून गेल्या. आठवेळा खासदारकी भूषविलेल्या सुमित्रा महाजन या राष्ट्रपती झाल्यास प्रतिभा पाटील यांच्या नंतरच्या त्या दुसऱ्या मराठी राष्ट्रपती ठरतील.

आनंदीबेन पटेल यांचाही विचार होऊ शकतो

राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या आनंदीबेन पटेल यांचंही नाव चर्चेत आहेत. आनंदीबेन पटेल या गुजरातच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा मोदी विचार करू शकतात असं सांगितलं जातं. सध्या देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या चारही महत्त्वाच्या पदावर पुरुषांची मक्तेदारी आहे. त्यामुळेही यंदा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी महिलेची वर्णी लागू शकते असं सांगितलं जातं.

संबंधित बातम्या:

Water Council : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जल साक्षर पिढी घडवणे महत्वाचे, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मांडले केंद्राचे धोरण

मोदींचा पहिल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कारानं गौरव होणार! 24 एप्रिलला मुंबईत पुरस्काराचं वितरण

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.