पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जम्मू-काश्मीरमध्ये, जवानांच्या शौर्याला सलाम, सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख

| Updated on: Nov 04, 2021 | 2:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. (PM Modi celebrates Diwali with soldiers in Jammu and Kashmir)

पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जम्मू-काश्मीरमध्ये, जवानांच्या शौर्याला सलाम, सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख
PM Modi
Follow us on

श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवांनाशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांशी संवाद साधला. लष्करातील जवान म्हणजे माझं कुटुंब आहे. या कुटुंबासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे. आधी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी जवानांसोबत दिवाळी साजरी करायचो. आता देशाचा पंतप्रधान म्हणून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतो, असं मोदींनी सांगितलं.

जवान हेच अभेद्य संरक्षण कवच

आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहरा देत असतात. त्यामुळेच संपूर्ण देश सुखाची झोप घेत आहे. आपले जवान म्हणजेच आपलं अभेद्य असं संरक्षण कवच आहे. त्यांच्यामुळेच देशात शांती आणि सुरक्षा बनलेली आहे. आपले जवान म्हणजे त्याग आणि शौर्याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत, असे गौरवोद्गागारही त्यांनी काढले. तुमच्याकडून ऊर्जा, नवी उमेद आणि नवा विश्वास घेण्यासाठी मी आज पुन्हा आलो आहे. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो नाही. तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या काळात येथील ब्रिगेडने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यावर देशाला आजही अभिमान वाटतो, असंही त्यांनी सांगितलं.

शस्त्रास्त्र निर्मितीतही आत्मनिर्भर

यावेळी त्यांनी जवानांच्या गौरवशाली इतिहासाला उजळणी दिली. नौशेराचे जवान शूर आहेत. जेव्हा कधी शत्रू सीमेवर पाय ठेवतात तेव्हा आपले जवान त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देतात, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारवरही टीका केली. पूर्वीच्या सरकार जवानांसाठी शस्त्र खरेदी करायचे तेव्हा त्यांना इतर देशावर अवलंबून राहावं लागायचं. मात्र, आता आत्मनिर्भर भारतावर जोर दिला जात आहे. आता देशातच अत्याधुनिक शस्त्रे तयार केली जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

महिलांच्या सहभागाने नवी ओळख

लष्करात महिलांचा सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. एनडीए आणि इतर मिलिट्री स्कूलमध्येही महिलांना संधी दिली जात आहे. आता लष्करातही महिलांचा सहभाग चांगला वाढला आहे. त्यामुळेच आपल्या लष्कराची देशभरात नवी ओळख निर्माण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. हजारो वर्षांपूर्वी भारत अमर होता आणि आजही अमर आहे आणि येणारी हजारो वर्ष भारत अमर राहील, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

Diwali 2021: मोदींनी सैनिकांसोबत साजरा केला दिपोत्सव

सोशल मीडियावरील मैत्रीतून 21 लाखांचा गंडा, आंतरराष्ट्रीय भामट्याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी दिल्लीत गाठले

(PM Modi celebrates Diwali with soldiers in Jammu and Kashmir)