शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (15 डिसेंबर) गुजरातमधील कच्छ (Gujarat kuch) येथे अनेक योजनांचं उद्घाटन केलं.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 4:20 PM

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (15 डिसेंबर) गुजरातमधील कच्छ (Gujarat kuch) येथे अनेक योजनांचं उद्घाटन केलं. ते एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर (Farmers Protest) मोदी कच्छमधील शेतकरी समुहांशिवाय गुजरातच्या शिख शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. ते या ठिकाणी देखील काही योजना सुरु करतील, अशी माहिती आहे (PM Modi criticize opposition over Farmer Protest in Gujarat kuch tour).

पंतप्रधान मोदी कच्छमध्ये सोलर पार्कसह अनेक योजनांची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, “शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे त्यांच्या जमिनीवर दुसरे ताबा घेतील अशी भीती शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. एखाद्या डेयरीवाल्याने तुमच्याशी दुध घेण्याचा करार केला तर तो तुमचं जनावर घेऊन जातो का? धान्य आणि दाळी उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांचं पीक विकण्याचं स्वातंत्र्य का मिळायला नको असा प्रश्न देश विचारत आहे. शेतीत सुधारणा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी देखील शेतीमाल कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करत होते. ”

“आज जे लोक विरोधी पक्षात बसून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत ते देखील आपल्या कार्यकाळात या सुधारणांचं समर्थन करत होते. ते शेतकऱ्यांना केवळ खोटे आश्वासनं देत राहिले. आता देशाने काही पावलं उचलली आहेत तर ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मी शेतकरी भावा-बहिणींना हेच सांगेल ती सरकार तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान काढेल, त्यासाठी सरकार 24 तास तयार आहे. शेतकऱ्यांचं हित पहिल्या दिवसापासून आमचं प्राधान्य राहिलं आहे,” असं मोदी म्हणाले.

“कोटेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने कच्छ बदललं आहे. कोरोनाने नक्कीच जग बदललं, मात्र कच्छचा रणउत्सव आजही जगाला आकर्षित करतो. भारत सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण करत आहेत,” असंही मोदींनी नमूद केलं.

पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मांडवीमध्ये खारं पाणी वापरण्यायोग्य बनवणाऱ्या संयंत्राचंही उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत खावडामध्ये जगातील सर्वात मोठे मिश्र रुपातील नवीन ऊर्जा पार्कही सुरु करण्यात आले. यामुळे 30,000 मेगावॅट क्षमतेच्या मिश्रित नव्या ऊर्जा पार्कमध्ये सौर पॅनल आणि पवनचक्कीच्या मदतीने ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. याशिवाय कच्छ आणि सौराष्ट्रात खारं पाणी वापरायोग्य करणाऱ्या आणखी 4 संयंत्राचंही उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी कच्छ जिल्ह्यातील सहकारी दुग्ध उत्पादक संघ, सरहद डेयरीमार्फत स्थापन केलेल्या एका संयंत्राचंही उद्घाटन करतील. या संयंत्रात 2 लाख लीटर दूध थंड करण्याची क्षमता आहे. ते केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनंतर्गत या डेयरी संयंत्राचं उद्घाटन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुजरातमधील शिख शेतकऱ्यांशी मोदी चर्चा करणार

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या शिख शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात आणि आजूबाजूच्या परिसरात मिळून एकूण 5,000 शिख कुटुंबं राहतात.

हेही वाचा :

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या एनर्जी पार्कचे करणार भूमीपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

PM Modi criticize opposition over Farmer Protest in Gujarat kuch tour

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.