Chandrayaan-3 Update | चांद्रयान 3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल, तेव्हा पंतप्रधान मोदी कुठे असतील?
Chandrayaan-3 Update | चांद्रयान-2 मिशनच्यावेळी लँडिंग प्रोसेस सुरु असताना पंतप्रधान मोदी इस्रोच्या कक्षात होते. यावेळी पंतप्रधान मोदी कुठे असतील?. ISRO ने 14 जुलैला चांद्रयान 3 मोहिम लाँच केली. पाच ऑगस्टला यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
नवी दिल्ली : भारताच मून मिशन चांद्रयान 3 च्या लँडिंगच काऊंटडाऊन सुरु आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला देश बनेल. इस्रोकडून एक नवीन इतिहास रचला जाईल. अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे, ही ऐतिहासिक घटना घडत असेल, तेव्हा पंतप्रधान मोदी कुठे असतील?. चांद्रयान 2 मिशनच्यावेळी ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार बनण्यासाठी मोदी तिथे उपस्थित होते. 6 सप्टेंबर 2019 रोजी पीएम मोदी इस्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयात उपस्थित होते.
पण 7 सप्टेंबरला चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरशी अखेरच्या क्षणी इस्रोचा संपर्क तुटला होता. क्रॅश लँडिंगमुळे एका भागात मिशनला अपयश आलं होतं. मोदींनी यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित करुन त्यांचा आत्मविश्वास उंचावला होता. तुम्हाला निराश व्हायची गरज नाही, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी यावेळी कुठे असतील?
चांद्रयान 3 मिशनमध्ये इस्रो ज्या दिवशी इतिहास रचणार, त्या दिवशी पंतप्रधान मोदी भारतात नसतील. पीएम मोदी उद्या 22 ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होतील. पीएम मोदी मंगळवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. पीएम संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पोहोचतील. तिथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. पीएम बुधवारी ब्रिक्सच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधानांना बुधवारी दुपारी दोन वाजता परराष्ट्र सचिवांकडून ब्रिफिंग दिली जाईल. पीएम 24 ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेत असतील. त्यानंतर ते मिस्त्रसाठी रवाना होतील. चांद्रयान-3 लॉन्चिंगच्या दिवशी पीएम मोदी कुठे होते?
ISRO ने 14 जुलैला चांद्रयान 3 मोहिम लाँच केली. पाच ऑगस्टला यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 14 जुलै लॉन्चिंगच्या दिवशी सुद्धा पीएम मोदी भारतात नव्हते. ते 13 जुलैलाच दोन दिवसीय दौऱ्यासाठी फ्रान्सला रवाना झाले होते. पीएम मोदी 14 जुलैला फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झाले होते.