‘टाईम’च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जी आणि अदर पुनावालांचा समावेश; पंतप्रधान मोदींवर आरोप

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील प्रभावशाली व्यक्तींमधील आपले स्थान कायम राखले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती शह देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही 'टाईम'च्या यादीत स्थान पटकावले आहे.

'टाईम'च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जी आणि अदर पुनावालांचा समावेश; पंतप्रधान मोदींवर आरोप
टाईम मासिक
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:17 AM

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध टाईम मासिकाने दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांचा समावेश करण्यात आला आहे. टाईम मासिकाकडून 2021 या वर्षात जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकणाऱ्या 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील प्रभावशाली व्यक्तींमधील आपले स्थान कायम राखले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला एकहाती शह देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही ‘टाईम’च्या यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय, भारतात कोरोनाची पहिली लस उपलब्ध करुन देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूमुळे प्रकाशझोतात आलेले अदार पुनावाला हेदेखील जगातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी भारताच्या इतिहासातील प्रमुख नेते

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 74 वर्षांच्या काळात तीन प्रमुख नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होत असल्याचे टाईम मासिकात म्हटले आहे. देशाच्या राजकारणावर संपूर्णपणे अंमल प्रस्थापित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे नेते आहेत.

‘मोदींनी मुस्लिमांचे अधिकार हिसकावून घेतले’

सीएनएन वृत्तवाहिनीचे पत्रकार फरीद जकारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रोफाईल लिहली आहे. यामध्ये फरीद जकारिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारताला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलले. त्यांनी देशातील अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाचे अधिकार हिसकावून घेतले. तसेच प्रसारमाध्यमांनाही धमकावले आणि कैद केले, असे फरीद जकारिया यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणखी कोणत्या नेत्यांचा समावेश?

भारतीय राजकारण्यांप्रमाणेच इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस, चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग, प्रिन्स हॅरी आणि मेगन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे.

तालिबानचा संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

अलीकडेच अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. या घडामोडींमुळे जगातील कुख्यात दहशतवादी आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर याचाही टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.