Kashi Vishwanath Corridor: काशी विश्वनाथ धाम हे परंपरा,आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक: नरेंद्र मोदी
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं काशी विश्वनाथ धामचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य सोहळ्याद्वारे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ धामाचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं.
वाराणसीः उत्तर पर्देशातील वाराणसी (Varanasi) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वनाथ धामाचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व वर्णन केलं. काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच भारताची प्राचीनता आणि नवीनता या दोन्ही इथे एकत्रितपणे जिवंत होताना दिसतात. इथल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देशात, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं.
अनंत ऊर्जेने भारलेलं विश्वनाथ धाम
काशी विश्वनाथ धामाचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज काशी विश्वनाथ धाम अकल्पित ऊर्जेनं भारलं आहे. आज इथल्या वैभवात आणखी विस्तार होतोय. हा नवा परिसर म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि भारतीय सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. भारतीय परंपरा, ऊर्जा, गतीशीलता इथं दिसून येते. इथे केवळ श्रद्धेचंच दर्शन घडतं असं नाही तर भारताच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूती इथे मिळते. प्राचीनता आणि नावीन्यते इथे एकत्रितपणे जिवंत होतात. इथल्या पुरातन प्रेरणा भविष्याला दिशा देतात.
महादेवाच्या चरणी लीन झालेल्या गंगेचा इथे दैवी अनुभव
यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ काशी विश्वनाथ येथील गंगा आपला प्रवाह बदलत उत्तरवाहिनी होऊन महादेवाच्या दर्शनासाठी येते. ती गंगा आज खूप प्रस्नन असेल. आपण विश्वनाथाच्या चरणी नमन करतो तेव्हा गंगेला स्पर्श करत येणारी हवा आपल्याला आशीर्वाद देते. महादेवाच्या चरणी ध्यान लावताना गंगेवरच्या लहरी आपल्याला दैवी आनंद देतात. गंगेत खूप शक्ती आहे. आजचं हे कार्य म्हणजे गंगेचा आशीर्वाद आहे,’ असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
वाराणसीतील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट
श्री काशी विश्वनाथ धाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचं आज लोकार्पण झालं. आज 13 डिसेंबर रोजी मोदी सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ऐतिहासिक लोकार्पणाला सुरुवात झाली. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाराणसी शहरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. गंगा घाट, कुंडाची साफ सफाई झाली. गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर 11 लाख दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच सरकारी कार्यालये, भनं, खासगी इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांनाही आकर्षकरित्या सजवण्यात येत आहे. या ठिकाणी भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं आहे. आज नागरिकांनीही आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी, दिवे लावावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
इतर बातम्या-