Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाला काही माहित नव्हतं अन् अचानक मोदींचा मेट्रोमधून प्रवास… पाहा व्हिडीओ!

PM Modi Metro Journey : नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी चक्क मेट्रोने प्रवास केला. मोदींच्या मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींनीही आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

कोणाला काही माहित नव्हतं अन् अचानक मोदींचा मेट्रोमधून प्रवास... पाहा व्हिडीओ!
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 4:01 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जातात. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करत नेहमी चर्चेत राहणाऱ्या मोदींनी यावेळी अचानक मेट्रोने प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी दिल्ली विद्यापीठाच्या शतकोत्सव महोत्सवाला हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी चक्क मेट्रोने प्रवास केला. मोदींच्या मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींनीही आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

नरेंद्र मोदींनी स्मार्टकार्डचा वापर करत मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केला. समयपूर बादली स्टेशनकडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये त्यांनी प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या मेट्रो स्टेशनवर उतरत मोदी शतकोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी मोदींनी तरुण-तरूणींशी अनेक गोष्टींवर चर्चा केली.

पाहा व्हिडीओ- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अगोदर रिकाम्या डब्यात चढले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांच्याजवळ तरुणांची गर्दी जमा झाली. यावेळी मोदींनी मेट्रो प्रवासाने उत्साह वाढल्याचं सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर अकांउटवरुनही एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यानंतर आपल्या भाषणामध्ये मेट्रो प्रवसावर भाष्य केलं. मेट्रोने प्रवास करुन विद्यापीठामध्ये येणं ही माझ्यासाठी आंनदाची गोष्ट आहे. ज्यावेळी दोन मित्र सोबत असतात त्यावेळी ते अनेक विषयांवर चर्चा करतात. या चर्चेमध्ये इजराईल देशापासून चंद्रापर्यंतचे विषय असतात. कोणता चित्रपट पाहिला?, कोणती ओटीटी सिरीज पाहिली? ती ओटीटी सिरीज पाहण्या लायक आहे कि नाही? ती रील पाहिली का? ट्विटरवर ट्रेंडिंग काय आहे ? अशे कितीतरी प्रश्न असतात. यावर ते मित्र गप्पा मारतात. म्हणून मी पण आज मेट्रोने प्रवास करुण तरुणांसोबत चर्चा केल्याचं मोदींनी भाषणात सांगितलं.

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.