Modi Cabinet Expansion: मोदींचा सोशल इंजिनीअरिंगवर भर, विस्तारात 27 ओबीसींसह 5 अल्पसंख्याकांचा समावेश
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशाला झुकतं माप देण्यात येणार आहे. (Modi cabinet expansion)

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशाला झुकतं माप देण्यात येणार आहे. तसेच नव्या विस्तारात 27 ओबीसी आणि 5 अल्पसंख्याक समाजातील नेत्यांचा समावेश करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने या विस्तारात सोशल इंजिनीअरिंगवर भर दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (PM Modi’s cabinet reshuffle: ‘Social engineering’ to balance caste equations)
2019मध्ये भाजप दुसऱ्यांदा केंद्राच्या सत्तेत आली. त्यानंतर पहिल्यांदाच मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार आज सायंकाळी 6 वाजता होत आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची रचना करण्यात येणार आहे.
ओबीसींचा वरचष्मा
नव्या विस्तारात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. मुस्लिम, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजातील प्रत्येकी एका नेत्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. तसेच 27 ओबीसी नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यापैकी 5 जण कॅबिनेट मंत्री असतील. त्यासिवाय अनुसूचित जनजातीच्या 8 नेत्यांचा समावेश करण्यात येणार असून यातील तिघांना कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. नव्या मंत्रिमंडळात अनुसूचित जातीच्या 12 नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यापैकी दोघांना कॅबिनेटमंत्रीपदी घेण्यात येणार आहे.
चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
नव्या विस्तारात चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे. तर राज्यातील 18 माजी मंत्र्यांनाही नव्या विस्तारात स्थान देण्यात येणार आहे. नव्या मंत्रिमंडळात दोन ते तीन वेळा निवडून आलेल्या खासदारांचा समावेश करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
43 नेत्यांचा शपथविधी
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.
शपथविधी पूर्वी चार मंत्र्यांचे राजीनामे
दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे. (PM Modi’s cabinet reshuffle: ‘Social engineering’ to balance caste equations)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 July 2021 https://t.co/VxS5s4m6LJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
संबंधित बातम्या:
असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल
राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण
(PM Modi’s cabinet reshuffle: ‘Social engineering’ to balance caste equations)