AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : 100 कोटी लसीकरण हे प्रत्येक भारतीयाचं यश, मेड इन इंडियाला लोक चळवळ करा, मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

दिवाळीचा सण सतर्कतेनं साजरा करा, मास्कचा वापर सर्वांनी करावा, लस न घेतलेल्यांनी मास्क लावलाच पाहिजे. आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास कोरोनाचं निर्मूलन होईल. येणाऱ्या सणांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

PM Modi : 100 कोटी लसीकरण हे प्रत्येक भारतीयाचं यश, मेड इन इंडियाला लोक चळवळ करा,  मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 10:56 AM

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी कोरोना लसीकरणामध्ये 1 अब्ज डोसचा टप्पा पार केल्यावरुन संवाद साधला. कोरोना विषाणू संसर्गाशी भारतानं दिलेला लढा, कोरोना लसींची निर्मिती, कोरोना लसीकरणातील यश, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येत आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आर्थिक सामाजिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रात देखील नवनव्या संकल्पना येत आहेत. आता आपण मेड इन इंडियाची ताकद समजून घेण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. सामूहिक शक्तीमुळे 100 कोटींच्या लसीकरणाचा विक्रम आपण करु शकलो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. दिवाळीच्या दिवसात वर्षभरातील सर्वात मोठी खरेदी विक्री होते. दिवाळीचा सण सतर्कतेनं साजरा करा, मास्कचा वापर सर्वांनी करावा, लस न घेतलेल्यांनी मास्क लावलाच पाहिजे. आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास कोरोनाचं निर्मूलन होईल. येणाऱ्या सणांसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

100 कोटी लसीकरण हे प्रत्येक भारतीयाचं यश

काल भारतानं 1 अब्ज म्हणजेच 100 कोटी कोरोना लसींच्या डोसचं कठिण लक्ष्य प्राप्त केलं आहे. या यशाच्या मागे 130 कोटी लोकांची कर्तव्य शक्ती आहे. हे भारताचं यश आहे. प्रत्येक भारतीयाचं यश आहे.

100 कोटींचं लसीकरण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतंय

जगातील मोठ्या देशांकडे लसींचं संशोधन करणं, लसींचा शोध लावणं त्याचं उत्पादन करणं या सर्व गोष्टी होत्या. भारत आतापर्यंत इतर देशांनी बनवलेल्या लसींवर अवलंबून होता. आज जगातील लोक भारताच्या कोरोना लसीकरणाची तुलना इतर देशांशी करतात. भारतानं ज्या वेगानं 100 कोटींचं लसीकरणं पूर्ण केलं त्याचं कौतुक केलं जातंय. भारताला लस मिळेल की नाही, दुसऱ्या देशांकडून खरेदी करण्यास किती पैसे जातील, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र त्या सर्व प्रश्नांची उत्तर 100 कोटी लसीकरणातून मिळाली आहेत.

सबका साथ सबका विश्वासाचं सर्वात मोठं उदाहरण

या लसीकरणामुळे जग भारताला अधिक सुरक्षित मानेल. संपूर्ण जग भारताची ताकद पाहत आहे. सबका साथ सबका विश्वासचं सर्वात मोठं उदाहरण आहे, असं सांगतानाच आजार सर्वांनाच होतो. त्यामुळे त्यावर व्हीआयपी कल्चरचा प्रभाव होऊ नये. केवळ व्हीआयपी लोकांनाच लस मिळू नये याची काळजी घेण्यात आली. कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल हे पाहिलं. त्यामुळेच सर्वांना लस मिळू शकली असं ते म्हणाले.

विज्ञानाचं महत्व अधोरेखित

भारताच्या संपूर्ण लसीकरणाचा पाया विज्ञानावर आधारीत आहे. वैज्ञानिक निकषांवर विकसित झालाय. वैज्ञानिक पद्धतीनं संपूर्ण जगभरात लसीकरणाची चर्चा सुरु आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या सर्वांसाठी लसीकरण ही अभिमानाची बाब आहे. भारताचा लसीकरणाचा कार्यक्रम , Science Born, Science Driven आणि Science Based राहिला आहे. असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जग भारताकडे सकारात्मकतेनं पाहतंय

जगातील तज्ञ आणि देश विदेशातील अनेक संस्था भारत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सकारात्मक नजरेनंन पाहतंय. आज भारतीय कंपन्यांमध्ये रेकॉर्डब्रेक गुंतवणूक होत आहे. युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. स्टार्ट अप्स मध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक येत आहे. रेकॉर्ड ब्रेक स्टार्टअप बनत आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मेड इन इंडियाचं महत्व अधोरेखित

नरेंद्र मोदी यांनी लहानात लहान गोष्ट बनवली आणि ती मेड इन इंडिया असेल, ती बनवण्यासाठी भारतीयानं घाम गाळला असेल तर त्याच्या खरेदीवर जोर दिला पाहिजे आणि हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून शक्य होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

स्वच्छ भारत अभियान एक जनआंदोलन

स्वच्छ भारत अभियान हे एक जनआंदोनल होतं. त्याप्रमाणं भारतात बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणं, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणं, वोकल फॉर लोकल होणं या गोष्टी आपण व्यवहारात आणण्याची गरज असल्याचम मोदी म्हणाले.

लसीकरणासाठी प्रेरित करा

आपण आतापर्यंत 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. दिवाळीसह अनेक सण आता येत आहेत. ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांनी लस न घेतलेल्या लोकांना प्रेरित करावं. लसीकरण झालं असलं तरी मास्कचा वापर केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कोविन अॅपचं जगभरातून कौतुक

वेगाने लसीकरण करण्यासाठी आपण एक यंत्रणा उभारली, कोविन अॅपचं जगभरातून कौतुक होत आहे. 100 कोटी डोस पूर्ण होणं, हे काही सोपी गोष्ट नव्हती. पण भारताने हे काम करुन दाखवली, त्यासाठी भारताने एक यंत्रणा उभारली. लसीकरण मोहिम करताना भारताने विज्ञानाची साथ सोडली नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

लसीकरणाचं यश प्रत्येक भारतीयाचं

आपल्या भाषणाला सुरुवात करताना, पीएम मोदी म्हणाले, “काल 21 ऑक्टोबर रोजी भारताने 100 कोटी लस डोसचे कठीण परंतु असाधारण लक्ष्य साध्य केले आहे. या यशामागे 130 कोटी देशवासीयांचे कर्तव्य आहे, त्यामुळे हे यश भारताचे यश आहे, प्रत्येक देशवासीयांचे यश आहे.

इतर बातम्या :

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

VIDEO: 100 कोटी लोकांचं व्हॅक्सिनेशन करून भारताने इतिहास रचला, सबका साथ, सबका विश्वासाचच हे फलित: पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi 100 crore vaccination is success of every Indian it will boost economy appeal to promote Made in India culture

तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.