PM Narendra Modi : ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो’, पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं.

PM Narendra Modi : 'आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो', पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 4:43 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज पंजाब (Punjab) दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणारं होतं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CM CharanjitSingh Channi) हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधानांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेला पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक असं म्हटलं आहे. गृह मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभूर चूक झाल्यानं त्यांचा ताफा माघारी फिरला. पंजाब सरकारला या चुकीबाबत जबाबदारी निश्चित करणे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानांकडून दौऱ्याची माहिती

आपल्या पंजाब दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक ट्वीट करुन आपल्या दौऱ्याबाबत माहिती दिली होती. ‘मी आज पंजाबमधील माझ्या बहिण आणि भावांमध्ये असेल. फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात 42 हजार 750 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली जाईल. या प्रकल्पांमुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल’, असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं.

इतर बातम्या :

VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.