PM Modi Ayodhya Ram Mandir Visit LIVE | अयोध्यानगरीचं पुरातन वैभव परत मिळविणार – नरेंद्र मोदी

| Updated on: Dec 31, 2023 | 7:13 AM

PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Visit LIVE Darshan Updates in Marathi | आज 30 डिसेंबर 2023, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकदिवसीय दौऱ्यात 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे अयोध्येत शिलान्यास करणार आहेत.

PM Modi Ayodhya Ram Mandir Visit LIVE | अयोध्यानगरीचं पुरातन वैभव परत मिळविणार - नरेंद्र मोदी
PM Modi in Ayodhya

अयोध्या, दि. 30 डिसेंबर 2023 | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा होणार आहे. रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टच्या उद्घाटन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकदिवसीय दौऱ्यात 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे शिलान्यास करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आयोध्यामध्ये ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आजपासून अयोध्याच्या सर्व रस्ते मोठे वाहनांसाठी तसेच चार चाकावरून प्रवास बंद करण्यात आलेले आहे. आता अयोध्या पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा वंदे भारत ट्रेन आणि दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यात मुंबई आणि जालना वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील सर्व अपडेट आणि अयोध्येतील प्रत्येक घडामोडींसाठी दिवसभर ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Dec 2023 04:55 PM (IST)

    मथुरामध्ये ही श्रीकृष्णाचे मंदिर व्हावं, भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी

    सिंधुदुर्ग : येणारे २०२४ वर्ष हे हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या भारतासाठी फार महत्वाचे आहे. कारण याची सुरवातच राम मंदिर निर्मानने होणार आहे. मथुरामध्ये ही श्रीकृष्णाचे मंदिर व्हावं आणि हिंदू समाजावर येणारे प्रत्येक संकट दूर व्हावं. यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी वर्षभरात करेन. नवीन वर्षासाठी हा संकल्प मी सोडलेला आहे असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.

  • 30 Dec 2023 04:49 PM (IST)

    वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

    मुंबई : अयोध्या नगरीतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या अशी मागणी मनसेने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

  • 30 Dec 2023 04:43 PM (IST)

    एयर इंडिया एक्स्प्रेसचं पहिलं विमान अयोध्या एयरपोर्टवर दाखल

    अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर पहिले विमान एयरपोर्टवर उतरलं आहे. एयरपोर्टवर ऐतिहासिक चित्रांचं रेखाटन करण्यात आलंय. अयोध्या नगरीची ओळख आलेल्या पर्यटकांना विमानतळावरच होणार आहे. अयोध्या विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी मोदींचे आभार मानले.

  • 30 Dec 2023 04:38 PM (IST)

    जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे मनमाड स्थानकात स्वागत

    मनमाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीडिओ कॉन्फसरींगद्वारे उदघाटन झालेल्या जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या मनमाड स्थानकात ढोल ताशांच्या गजरात आणि शालेय मुलांनी तिरंगा ध्वज दाखवून जोरदार स्वागत केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्हिडीओ कॉन्फसरींग हिरवा झेंडा दाखविला. संपूर्ण वातानुकुलीन आणि सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक गाडी जालना – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे.

  • 30 Dec 2023 04:35 PM (IST)

    आमंत्रण येऊ दे, जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन – सुप्रिया सुळे

    पुणे : महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ आहे. पाणी प्रश्न आहे, पाणी कपात झाली आहे, म्हणून सरकारने घर फोडणे, पक्ष फोडणे बंद करून अडचणी दूर कराव्यात. ट्रिपल सरकार असंवेदनशील आहे. सरकार काय करतंय ते बघा. शेतकरी प्रश्न सोडवले जावे हे महत्वाचे आहे. अयोध्या राम मंदिरचे आमंत्रण तर येऊ दे. मी जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 30 Dec 2023 04:25 PM (IST)

    जालना येथे भाजप एमआयएमचे कार्यकर्ते आमनेसामने

    जालना : जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. भाजप राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासदार इम्तियाज जलील रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे एमआयएम आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले.

  • 30 Dec 2023 04:20 PM (IST)

    जालना ते मुंबई या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

    नाशिक : मध्य रेल्वेच्या जालना ते मुंबई या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात आले. आठ बोगी असलेल्या एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईला जाण्याचा प्रवास सुखकर होईल. जालना येथून निघालेल्या या एक्स्प्रेसचे छत्रपती संभाजीनगर, मनमाड आणि त्यानंतर नाशिक येथील नाशिकरोड या रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. नाशिकरोड येथे आल्यानंतर या एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

  • 30 Dec 2023 04:12 PM (IST)

    2024 मध्ये होणार नाही हाल, मोदी येतील बार बार, रामदास आठवले यांची कविता

    इगतपुरी : नाशिक आहे थंडगार, 2024 मध्ये नरेंद्र मोदींचे होणार नाही हाल, मोदी येतील बार बार अशी कविता रामदास आठवले यांनी म्हटली. आज मोदीजी अयोध्येत आले आहेत. अनेक वर्षाचा हिंदू समाजातील मुद्दा शांत झाला आहे. राम मंदिरांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम बिजेपीचा नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा देश आहे. सगळ्या समाजाचे लोक इथे राहतात त्याचे निमंत्रण सगळ्या पक्षांना, धर्मगुरू यांना निमंत्रण दिले आहे असेही ते म्हणाले.

  • 30 Dec 2023 04:04 PM (IST)

    नमो अँपच्या माध्यमातून विकसित भारत अभियान आम्ही आणलं – कुलजीत सिंग चहल

    देशात सर्वत्र सध्या अयोध्याचीच चर्चा होत आहे. आज पूर्ण देश पंतप्रधान मोदींसोबत जोडला जात आहे. त्याचप्रमाणे नमो अँपच्या माध्यमातून विकसित भारत अभियान आम्ही आणलं आहे. एक करोडपेक्षा अधिक विकसित भारत ऍम्बेसीडर बनले पाहिजेत हा आमचा संकल्प आहे. ज्यांना मोदी सरकारकडून लाभ मिळाला त्यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन नमो अँपचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी केले.

  • 30 Dec 2023 03:15 PM (IST)

    अयोध्याला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवा- नरेंद्र मोदी

    अयोध्याला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवा असे थेट नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 03:08 PM (IST)

    22 जानेवारीला सर्वांनी दिपोत्सव करा- नरेंद्र मोदी

    22 जानेवारीला सर्वांनी दिपोत्सव करा असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 03:05 PM (IST)

    राम मंदिरामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील- नरेंद्र मोदी

    राम मंदिरामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 03:03 PM (IST)

    केंद्र सरकार अयोध्याच्या विकासासाठी कटिबद्ध- नरेंद्र मोदी 

    केंद्र सरकार अयोध्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नरेंद्र  मोदी यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 02:52 PM (IST)

    अयोध्ये नगरीचं पुरातन वैभव परत मिळविणार – नरेंद्र मोदी

    अयोध्येत राम मंदिर बनल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विकास कामे करून अयोध्येला स्मार्ट सिटी बनविले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अयोध्या धाम जंक्शन, महर्षी वाल्मिकी एअर पोर्ट उद्धाटनाचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 02:46 PM (IST)

    15 हजार कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना मंजूरी दिल्याने अयोध्येचा विकास होणार – नरेंद्र मोदी

    15 हजार कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना मंजूरी दिल्याने अयोध्येचा विकास होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 30 Dec 2023 02:33 PM (IST)

    दिल्लीतून थोड्या वेळात अयोध्येसाठी पहिलं विमान रवाना होणार

    दिल्लीतून थोड्याच वेळात अयोध्येसाठी पहिलं विमान रवाना होणार आहे. एयर इंडिया एक्सप्रेसचे हे पहिले विमान असणार आहे. यावेळी प्रवाशांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत.

  • 30 Dec 2023 01:44 PM (IST)

    Ayodhya Airport : असं असेल अयोध्या विमानतळ

    विमानतळाचा पहिला टप्पा 1 हजार 450 कोटी रूपये खर्च करून विकसीत केले आहे. विमानाचं टर्मिनल 6 हजार चौरस मीटर परिसरात पसरले आहे. हे आंतर राष्ट्रीय विमानतळ असणार आहे. विमानतळाचा मुख्य भाग हा राम मंदिरासारखा असणार आहे. आतमधल्या भागात आकर्षक अशी कलाकृती आहे.

  • 30 Dec 2023 01:38 PM (IST)

    PM Modi in Ayodhya : थोड्याच वेळात अयोध्या विमानतळाचे उद्धाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. विमानचं टर्मिनल 500 चौरस मिटर परिसरात पसरलेलं आहे. दरवर्षी 10 दहा लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज आहे.

  • 30 Dec 2023 01:21 PM (IST)

    Maharashtra News : ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू- संजय राऊत

    ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले. आमच्या पक्षावर लोकांचा विश्वास असल्यानं मोठ्या प्रमाणात लोकं पक्ष प्रवेश करत आहेत.

  • 30 Dec 2023 01:16 PM (IST)

    Maharashtra News : संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

    संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळा जे भावूक आहेत ते निष्ठेने पक्षासोबत आहेत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

  • 30 Dec 2023 12:52 PM (IST)

    Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोकांचा उत्साह

    पंतप्रधान नरेंद्र मोदीही अयोध्येतील जनतेला अभिवादन करत आहेत. पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पीएम मोदी अयोध्येत रोड शो करत आसून मोदी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत.

  • 30 Dec 2023 12:26 PM (IST)

    Ayodhya Ram Mandir : अयोध्येहून अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेन रवाना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम जंक्शन येथून अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

  • 30 Dec 2023 12:15 PM (IST)

    Ayodhya Ram Mandir : अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री आणि मंत्रीही उपस्थित होते.

  • 30 Dec 2023 11:45 AM (IST)

    अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर प्रदेशातील अयोध्येत पोहोचताच जंगी स्वागत करण्यात आलं आहे. पहा रोड शोचा व्हिडीओ-

  • 30 Dec 2023 11:30 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले, रोड शोला सुरुवात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

  • 30 Dec 2023 11:14 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 किलोमीटर रोड शो सुरू

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 किलोमीटर रोड शो सुरू आहे. या रोड शोसाठी जोरदार तयारी करण्यात आली. ब्लॅक कमांडो, पी एस सी आणि स्थानिक पोलीस दल तैनात आहेत.

  • 30 Dec 2023 10:57 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरीत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या एअरपोर्टवर दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात अयोध्या धाम जंक्शनवर पोहचतील. या रेल्वे स्टेशनचे ते उद्धघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रामनगरी फुलांनी सजली आहे.

  • 30 Dec 2023 10:50 AM (IST)

    22 जानेवारी रोजी भव्य मंदिराचे उद्धघाटन

    श्रीराम जन्म भूमीचे भव्य दिव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी १२ वाजून ३० मिनिटांच्या जवळपास रामलला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीपासून सात दिवसांचे अनुष्ठान करण्यात येणार आहे.

  • 30 Dec 2023 10:16 AM (IST)

    थोड्याच वेळात पंतप्रधान अयोध्येत पोहचणार

    थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होत आहे. ते सर्वात अगोदर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्धघाटन करतील. त्यानंतर ते रोड शो करतील. आज अयोध्या नगरी सजली आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

  • 30 Dec 2023 10:13 AM (IST)

    अमृत भारतसह वंदे भारतची भेट

    पंतप्रधान मोदी शनिवारी अयोध्या नगरीतून देशभरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या जलद सुविधेचे उद्धघाटन करतील. 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्या-दरभंगा या दरम्यान एक अमृत भारत तर अयोध्या ते आनंद विवाह टर्मिनल या दरम्यान वंदे भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे

  • 30 Dec 2023 10:03 AM (IST)

    15000 कोटींची विकास कामे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली आहे. ते धर्मपथ ते रामपथ असा 15 किमीचा रोड शो करणार आहेत. त्यानंतर 11:30 वाजता ते रेल्वे स्टेशनवर पोहचतील.

  • 30 Dec 2023 10:01 AM (IST)

    पंतप्रधान करणार अनेक योजनांचा श्रीगणेशा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांच्या नगरीतून मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षांचे गिफ्ट देणार आहे. जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवतील. अयोध्येतील एअरपोर्ट, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन, अमृत भारत या योजनांचा पण आज श्रीगणेशा होत आहे.

  • 30 Dec 2023 09:57 AM (IST)

    अयोध्या नगरी सज्ज, उत्सुकता पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाची… 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संत समाज सज्ज आहे. यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभूतपूर्व स्वागत अयोध्या मध्ये होणार आहे. संगीत वादन पारंपरिक पारंपरिक भेष गायन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता अयोध्येत प्रतिक्षा आहे ती, पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाची…

  • 30 Dec 2023 09:45 AM (IST)

    अयोध्येत पंतप्रधानांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जाणार

    अयोध्येत पंतप्रधान मोदी यांचं शंख, डमरू आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे.  मोदींचं अयोध्येत आगमन होताच शंख आणि डमरूही वाजवण्यात येणार आहेत. विमानतळ ते धरमपथ, रामपथ मार्गे रेल्वे स्थानक परिसरात मोदींचं स्वागत केलं जाईल. 1400 हून अधिक लोककलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. याशिवाय विमानतळ संमेलनस्थळी 30 लोककलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहेत.

  • 30 Dec 2023 09:30 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 किलोमीटर रोडशो

    अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन होणार आहे. संपूर्ण तयारी आणि बंदोबस्त करण्यात आलेला आहे. अयोध्या भक्तीमय झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 किलोमीटर रोडशो करणार आहे. अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे.

  • 30 Dec 2023 09:15 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार

    पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येतील रस्त्याच्या दुतर्फा फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळतेय.  अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी कमानी तयार करण्यात आल्या आहेत.  थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत.

  • 30 Dec 2023 09:00 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live : अयोध्या झोनचे आयजी प्रवीण कुमार काय म्हणाले?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन योग्य व्यवस्था केली आहे. सर्व कार्यक्रमांच यशस्वी आयोजन होईल, असं अयोध्या झोनचे आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितलं.

  • 30 Dec 2023 08:48 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live : मोदींच्या स्वागताचा अयोध्येत उत्साह

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये येणार आहेत. त्यावेळी स्थानिक कलाकार आपली लोककला सादर करतील. त्याचीच एक झलक.

  • 30 Dec 2023 08:29 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live : पीएम मोदी अयोध्येत कुठे सेल्फी काढणार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या भेटीआधी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट केलय. राममय अयोध्या धाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत आहे. त्यांच्याहस्ते आज श्री अयोध्या धाममध्ये ‘विकासाच्या नव्या युगाचा सूत्रपात’ होणार आहे. पीएम मोदी लता मंगेशकर चौकात सेल्फी घेणार.

  • 30 Dec 2023 08:19 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live : असं आहे पीएम मोदींच्या अयोध्या दौऱ्याच शेड्यूल

    पीएम 8.35 वाजता दिल्लीवरुन अयोध्येसाठी निघतील.

    सकाळी 9.50 मिनिटांनी अयोध्या एअरपोर्टवर पोहोचतील. तिथून रस्ते मार्गाने 10.30 वाजता अयोध्या जंक्शन रेलवे स्टेशनवर पोहोचतील.

    सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत अयोध्या धाम रेलवे स्टेशनच्या नव्या इमारतीच उद्घाटन करतील.

    सकाळी 11.05 वाजता रेल्वे स्टेशनवरुन बाहेर पडतील. रोड शो करुन 12.25 वाजता एअरपोर्टवर पोहोचतील.

    दुपारी 12.30 वाजल्यापासून 12.45 वाजेपर्यंत एअरपोर्टच्या नव्या टर्मिनलची पाहणी करतील.

    दुपारी 12.50 वाजता एअरपोर्टवरुन बाहेर पडून 12.55 वाजता सभा स्थळी दाखल होतील. दुपारी 1 वाजता सभा स्थळी लोकार्पण-शिलान्यास करतील. त्यानंतर दोन वाजेपर्यंत जनसभेला संबोधित करतील.

    दुपारी 2 वाजता पीएम एअरपोर्टवर जातील. तिथून दिल्लीला रवाना होतील.

  • 30 Dec 2023 07:58 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live: अयोध्या रेल्वे स्टेशनवर वर्ल्ड क्लास सुविधा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार आहे. या स्टेशनवर जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 241 कोटी रुपयांच्या खर्चातून हे स्टेशन अद्यावत करण्यात आले आहे.

  • 30 Dec 2023 07:46 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live: पंतप्रधानांचे आगमन होताच डमरु, शंखाचा निनाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात उत्तर प्रदेश आणि देशातील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यावेळी 1400 पेक्षा जास्त कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

  • 30 Dec 2023 07:33 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live: पंतप्रधान अयोध्या विमानतळावर पोहचणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय महामार्गावरुन धर्म पथ, लता चौक, राम पथ, टेढी बाजार आणि मुहावरा बाजार या मार्गाने अयोध्या धाम रेल्वे स्टेशन पोहचणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या रोड शो दरम्यान पंतप्रधान रामललाचे दर्शन करणार आहे. त्यानंतर अयोध्या धाम रेलवे स्टेशनचे उद्घाटन करणार आहे.

  • 30 Dec 2023 07:19 AM (IST)

    PM Modi Ayodhya Visit Live: पंतप्रधान अयोध्या विमानतळावर 10.45 वाजता पोहचणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार अयोध्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्याला 15,700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. पीएम मोदी सकाळी 10.45 वाजता अयोध्या विमानतळावर पोहचणार आहे.

Published On - Dec 30,2023 7:15 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.