Modi Cabinet Expansion Live: 2019 मध्ये केंद्रात बहुमताने सत्तारुढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडतो आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या विस्ताराआधी सरकारमधील 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले. महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील दिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि राज्यसभा खासदार भागवत कराड यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विस्तार?
येत्या काही दिवसांमध्ये किंवा पुढील वर्षी देशात विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उदा. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिथे भाजपनं 7 मंत्रिपदं दिली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटक, त्रिपुरा, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यातील नेत्यांनाही भाजपनं मंत्रिपदं दिली आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारातून त्या त्या राज्यांमध्ये भाजपच्या पक्षसंघटनेला बळ मिळण्याची शक्यता आहे.
1) थावरचंद गहलोत
2) सदानंद गौड़ा
3) रविशंकर प्रसाद
4) रमेश पोखरियाल निशंक
5) डॉ. हर्षवर्धन
6) प्रकाश जावडेकर
7) बाबुल सुप्रियो
8) संतोष गंगवार
9) संजय धोत्रे
10) रतन लाल कटारिया
11) प्रताप सारंगी
12) देबोश्री चौधरी
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक
नारायण राणेंकडे शुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय
नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद
राणे यांच्याकडे महत्त्वाचे मंत्रालय
भागवत कराड अर्थ राज्यमंत्री
रावसाहेब दानवे-रेल्वे राज्य मंत्री
भारती पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी
पशुपती कुमार पारस नवे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
गजेंद्र सिंग शेखावत नवे केंद्रीय जलशक्ती मंत्री
राज कुमार सिंग नवे केंद्रीय ऊर्जामंत्री
धर्मेंद्र प्रधान नवे केंद्रीय शिक्षणमंत्री असतील
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून पेट्रोलियम मंत्रायलाचा कारभार काढला
शहरी विकास आणि पेट्रोलियम मंत्रालय आता हरदिपसिंग पुरी यांच्याकडे
ज्योतिरादित्य शिंदे हवाई वाहतूक मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञान खातं
सहकार मंत्रायलयाची अतिरिक्त जबाबदारी अमित शाह यांच्याकडे
पुरुषोत्तम रुपालांकडे दूध आणि मत्स्य मंत्रालय
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्याकडे महिला बालकल्याण राज्यमंत्रिपद
पियुष गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय
मिनाक्षी लेखी- राज्य मंत्री, परराष्ट्र मंत्रालय तसेच सांस्कृतिक मंत्रालय
अनुराग ठाकूर नवे केंद्रीय क्रीडामंत्री
अनुराग ठाकूर हे देशाचे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री असतील
गिरीराजसिंह हे देशाचे नवे केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री असतील
पशुपती पारस नवे अन्न प्रक्रिया मंत्री असतील
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय
स्मृती ईराणींकडे महिला आणि बाल कल्याण मंत्रालय
भूपेंद्र यादव यांच्याकडे कामगार आणि पर्यावरण मंत्रालय
किरण रिजेजू यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय असेल
सर्बानंद सोनवाल यांच्याकडे ईशान्य विकास तसेच आयुष मंत्रालय
किरण रिजेजूंकडे कायदा मंत्रालयचाही पदभार असेल
मोदी मंत्रिमंडळाचं नवं खातंवाटप जाहीर ;
मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री
अमित शाह यांच्याकडे मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन पदभार (अमित शाहांकडे नव्यानं तयार केलेलं सहकार मंत्रालय)
स्मृती इराणींकडे फक्त महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालय
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, तसेच ते माहिती तंत्रज्ञान मंत्रीही असतील
पीयूष गोयल यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान आता केंद्रीय शिक्षण मंत्री असतील
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. मी पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात जी जबाबदारी देण्यात येईल ती सांभाळेल. इतक्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. आज सांगताना आनंद होतोय. पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री झालोय. महाराष्ट्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन.
दिल्ली : नारायण राणे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री 1999 साली झाले. अनेक चढउतार आले. मात्र शेवटी मी सांगितल्याप्रमाणे मोदी, शाह, जेपी नड्डा यांच्या कृपेने, आशीर्वादाने मला मंत्रिपद मिळालं आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास सर्थकी लावेल. एकाच दिवशी सर्व गोष्टींबद्दल सांगू शकत नाही. मात्र, भाजप पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार आरक्षण न मिळण्याला जबाबदार आहे. यांनी भारतीय घटना वाचावी. प्रकाश पडला तर पाहावे.
सिनियारीटी प्रमाणे मी एक नंबरला गेलो. मी विधानसभेच्या सात टर्म केलेल्या आहेत. त्यामुळे माझा पहिला नंबर लागला.
जॉन बार्ला, डॉ. एल. मुरुगन निसिथ परमानिक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदावर संधी मिळाली आहे. निसिथ परमानिक हे पश्चिम बंगालमधील भाजप खासदार आहेत. तर एल मुरुगन हे तामिळनाडूमध्ये ते भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात.
दिल्ली: मुंजपरा महेंद्रभाई, जॉन बारला, एल.मुरुगन, निशीथ प्रमाणिक ने राज्य मंत्री पद की शपथ ग्रहण की। pic.twitter.com/b4uU1yEFEJ
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2021
भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद#BharatiPawar | #ModiCabinetExpansion | #Modi https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/By2BRdnaJI
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
बिश्वेशवर तुडू, शंतनू ठाकूर आणि मुंजापरा महेंद्रभाई यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदावर संधी मिळाली आहे. बिश्वेशवर तुडू हे मणिपूर, तर शंतनू ठाकूर पश्चिम बंगाल आणि मुंजापारा महेंद्रभाई हे गुजरातमधून प्रतिनिधीत्त्व करतात. अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून मुंजापारा महेंद्र भाई यांना ओळखलं जातं.
भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ #Bhagwatkarad | #BJP | #ModiCabinetExpansion pic.twitter.com/klW0PzxUvU
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
सुभाष सरकार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. पश्चिम बंगालमधून दोन मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सुभाष सरकार यांना संधी देण्यात आलीय. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.
प्रतिमा भौमिक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर संधी मिळाली आहे. 1991 पासून भाजपमध्ये त्या सक्रिय झाल्या. त्रिपुरामधून त्या खासदार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात कपिल पाटील यांना राज्यमंत्री पदावर संधी#kapilpatil | #ModiCabinetExpansion | #NarendraModi pic.twitter.com/vUlN6rhqTw
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
भगवंत खुबा यांना केंद्रीय मंत्री मंडळात राज्यमंत्री पदावर संधी मिळाली आहे. ते कर्नाटकातील बिदर येथून ते खासदार आहेत. ते बीई मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
चौहान देवूसिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर संधी मिळाली आहे. ते गुजरातमधील खेडा येथील खासदार म्हणून ते काम पाहतात.
अजयकुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे.
बी एल वर्मा यांना राज्य मंत्रिपदावर संधी, ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व करतात. गेल्या वर्षी त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख ओबीसी नेते आहेत. राज्य सभेवर त्यांची निवड करण्यात आली होती.
अजय भट्ट यांना केंद्रीय मंत्रिंडळात संधी, उत्तराखंडमधील भाजपचे प्रमुख खासदार आहेत. येत्या काळात उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजय भट्ट यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जात आहे.
कौशल किशोर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे.
#CabinetExpansion2021 | A Narayanaswamy, Kaushal Kishore and Ajay Bhatt take oath as ministers. pic.twitter.com/vNNbI8cDiP
— ANI (@ANI) July 7, 2021
ए नारायणस्वामी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्य मंत्रीपदावर संधी मिळाली आहे. कर्नाटकातील चित्रदूर्ग येथून ते लोकसभेवर निवडून आले आहेत. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची निवड महत्वाची मानली जात आहे.
अन्नपूर्णा देवी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. 1998 पासून त्या राजकारणात कार्यरत आहेत. त्या झारखंड येथून खासदार आहेत. राजद मध्ये त्या कार्यरत होत्या. 2019 ला त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली.
मिनाक्षी लेखी यांना राज्यमंत्रीपदावर संधी, मोदींच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. मिनाक्षी लेखी या दोनवेळा दिल्लीतून खासदार झालेल्या आहेत. कायद्याच्या पदवीधर आहेत. सुप्रीम कोर्टात त्या वकिल म्हणून काम करतात.
दर्शना विक्रम जरदोश यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. त्या गुजरात येथील सुरत लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दर्शना जरदोश यांनी इंदिरा गांधींचा सर्वाधिक मताधिक्यानं विजेत्या झालेल्या महिला खासदार ठरल्या
भानू प्रताप शर्मा यांना राज्यमंत्रिपदावर संधी, उत्तर प्रदेशातूून लोकसभेवर प्रतिनिधी आहेत. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे.
शोभा करंदाजळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्या कर्नाटकातील भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रिपदी संधी मिळाली आहे.
राजीव चंद्रशेखर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. ते कर्नाटकातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करतात.
सत्यपाल सिंघ बाघेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.
#CabinetExpansion2021 | Pankaj Choudhary, Anupriya Singh Patel, and Satya Pal Singh Baghel take oath as ministers. pic.twitter.com/LCBnWLf6pn
— ANI (@ANI) July 7, 2021
अनुप्रिया पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर संधी देण्यात आली आहे. अनुप्रिया पटेल अपना दलाच्या नेत्या आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्वाची मानली जात आहे.
पंकज चौधरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. ते सहावेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
अनुराग ठाकूर यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांना या शपथविधीद्वारे बढती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल. काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते.
जी.कृष्णा रेड्डी हे तेलंगाणातील सिकंदराबाद येथील खासदार आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. तेलंगाणातील भाजपच्या विस्ताराच्या दृष्टीनं त्याचा समावेश महत्वाचा आहे.
पुरषोत्तम रुपाला यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रुपाला हे सध्या राज्यमंत्री आहेत त्यांची देखील कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते गुजरातमधून येतात ते राज्यसभा सदस्य आहेत.
भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते राजस्थान मधून राज्यसभेवर आहेत. अमित शाह यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.
#CabinetExpansion2021 | Hardeep Singh Puri, Mansukh Mandaviya, Bhupender Yadav take oath as ministers. pic.twitter.com/qs9DsRAWC9
— ANI (@ANI) July 7, 2021
मनसुख मांडवीय यांना केंद्रीय मंत्रीपदाची शपथ राष्ट्रपतींच्यावतीन देण्यात आली. ते गुजरातमधून राज्यसभेवर खासदार आहेत. सध्या ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत. त्यांचं देखील प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते सनदी अधिकारी देखील राहिले आहेत. सध्या ते हवाई उड्डाण राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत.
पशुपती कुमार पारस , किरेन रिजीजू, आणि राजकुमार सिंह यांना राष्ट्रपतींमार्फत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
#CabinetExpansion2021 | Pashupati Kumar Paras, Kiren Rijiju and Raj Kumar Singh take oath as ministers. pic.twitter.com/XzpZ1ejxdx
— ANI (@ANI) July 7, 2021
डॉ.विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंदीया, रामचंद्र प्रसाद सिंह , आश्विनी वैष्णव यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
डॉ.विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंदीया यांना मंत्रिपदाची शपथ#VirendraKumar | #JyotiradityaScindia | #ModiCabinetExpansion | #ModiCabinetReshuffle pic.twitter.com/gXDustlUmc
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
सर्बानंद सोनोवाल आसामचे माजी मुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिल्याचं त्यांना बक्षीस मिळालं आहे.
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली #ModiCabinetExpansion #ModiCabinetReshuffle | #NarayanRane | @MeNarayanRane pic.twitter.com/vkzVB3N8o6
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात 43 मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं राष्ट्रपती भवनात आगमन झालेलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनानंतर शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील दरबार हॉलमध्ये दाखल झाले आहेत.
Modi Cabinet Reshuffle: राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात होत आहे.
प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती आहे. प्रकाश जावडेकर यांच्या नावाची सोशल मीडियावर दुपारपासूनच चर्चा सुरु होती.
The President of India accepts resignation of 12 members of the Council of Ministers including IT Minister Ravi Shankar Prasad, Environment Minister Prakash Javadekar, Health Minister Harsh Vardhan, Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank and others: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/mNbP2V3lhn
— ANI (@ANI) July 7, 2021
नरेंद्र मोदी आणि भाजपनं भाषणापेक्षा महिला सक्षमीकरण कृतीतून दाखवून दिलं, अशी पहिली प्रतिक्रिया दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या पार्श्वभूमीवर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये संवाद साधल्याचं भारती पवार यांनी सांगितलं आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
नारायण राणे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानातून राष्ट्रपती भवनाकडे रवाना होणार आहेत. दिल्लीतील निवासस्थानाहून ते घराबाहेर पडले आहेत. नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निलम राणे या देखील सोबत असतील.
1. नारायण राणे
2. सर्बानंद सोनोवाल
3. डॉ.विरेंद्र कुमार
4. ज्योतिरादित्य सिंदीया
5. रामचंद्र प्रसाद सिंह
6. आश्विनी वैष्णव
7. पशुपती कुमार पारस
8. किरेन रिजीजू
9. राजकुमार सिंह
10. हरदीप सिंघ पुरी
11. मनसुख मांडविय
12. भुपेंद्र यादव
13. पुरषोत्तम रुपाला
14. जी.कृष्णा रेडेडी
15. अनुराग ठाकूर
16. पंकज चौधरी
17 अनुप्रिया सिंग पटेल
18 सत्यपाल सिंघ भाघेल
19 राजीव चंद्रशेखर
20 सुश्री शोभा करंडलजे
21 भानू प्रताप सिंघ वर्मा
22दर्शना विक्रम जर्दोष
23 मिनाक्षी लेखी
24 अन्नपूर्णा देवी
25 अे नारायणस्वामी
26 कौशल किशोर
27 अजय भट्ट
28 बी.एल. वर्मा
29. अजय कुमार
30. चौहान देवूसिंह
31. भागवत खुबा
32. कपिल मोरेश्वर पाटील
33. सुसरी प्रतिमा भौमिक
34. सुभाष सरकार
35 भागवत कृष्णराव कराड
36 राजकुमार रंजन सिंग
37 डॉ. भारती प्रविण पवार
38. बिश्वेशवर तुडू
39. शंतनू ठाकूर
40. मुंजापारा महेंद्रभाई
41. जॉन बार्ला
42. डॉ. एल. मुरुगन
43. नितीश परमानिक
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Babul Supriyo, MoS Environment, Forest & Climate Change resigns from the Council of Ministers ahead of Union Cabinet reshuffle. pic.twitter.com/GkV3v1E3I9
— ANI (@ANI) July 7, 2021
Delhi | Prime Minister Narendra Modi’s meet at Lok Kalyan Marg with BJP MPs, ahead of cabinet expansion. pic.twitter.com/ukJJQnW1X4
— ANI (@ANI) July 7, 2021
सर्वानंद सोनोवाल (आसाम)
ज्योतिरादित्य सिंधिया (मध्यप्रदेश)
अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश)
पशुपती पारस (बिहार)
मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली)
अजय भट्ट (उत्तराखंड)
शोभा करदंलाजे (कर्नाटक)
नारायण राणे (नारायण राणे)
अजय मिश्र (उत्तर प्रदेश)
आरसीपी सिंह (बिहार)
भूपेंद्र यादव (राजस्थान)
कपिल पाटिल (महाराष्ट्र)
बीएल वर्मा (उत्तर प्रदेश)
अश्ववनी वैष्णव (ओडिशा)
शांतनु ठाकूर(बंगाल)
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खरा ओबीसी चेहरा विसरली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण खरा गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. हर्षवर्धन यांना दुसरं खात दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आरोग्य मंत्रालयाचा राजीनामा दिला
नारायण राणे
भागवत कराड
कपिल पाटील
डॉक्टर भारती पवार
भाजप खासदार नारायण राणेंना अवजड उद्योग खातं मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
2019 च्या विजयानंतर मोदी सरकारच्या पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळात फेरबदल करताना दिसत आहे. नव्या मंत्रिमंडळात सामाजिक समतोल राखण्याच प्रयत्न दिसून येण्याची शक्यता आहे. अल्पसंख्यांक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना अधिक प्रतिनिधित्व देण्यात येईल. नव्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक समाजातील मंत्री असतील, ज्यात 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध आणि 1 ख्रिश्चन समाजातील नेत्यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात ओबीसीचे 27 मंत्रीही असतील, त्यापैकी 5 यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळतील अशी माहिती आहे. अनुसूचित जमातीच्या 8 खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागेल त्यापैकी 3 जणांना कॅबिनेट आणि तर 5 जणांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे. याशिवाय अनुसूचित जाती समजाताील 12 सदस्यांना मंत्रीपद संधी मिळणार आहे. यापैकी 2 जणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. याशिवाय चार माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपदी संधी मिळेल. तर, 11 महिला नेत्यांना संधी मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रकृतीच्या कारणामुळं राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
आज 43 नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार हे निश्चित
सायंकाळी सहा वाजता मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रीमंडळ विस्ताराआधी महत्वाची बैठक संपली
बैठकीला संभाव्य मंत्र्यांचीही हजेरी
नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनवाल हेही बैठकीला हजर
नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सायंकाळी पार पडतोय. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रा, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे ह्या मंत्रीमंडळ विस्तारापुर्वी केंद्रातल्या चार मोठ्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेलेत. त्यात केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. महाराष्ट्रातूनही काहींना संधी मिळणार आहे.
मंत्री संतोष गंगवार यांनी कामगार मंत्रालयाचा राजीनामा दिला