केरळमध्ये एपीएमसी नाही, मग दिल्लीत फोटो काढण्यापेक्षा तिथे आंदोलन का करत नाही?; पंतप्रधानांचा सवाल
नवी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)
नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. एपीएमसीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. केरळ सारख्या राज्यात तर एपीएमसीच नाही. मग दिल्लीतील आंदोलनात फोटो काढण्यापेक्षा केरळमध्ये जाऊन आंदोलन का करत नाही? असा खरमरीत सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर देशावासियांशी संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. नव्या कायद्यातील एपीएमसीच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पण केरळात तर एपीएमसीची व्यवस्थाच नाही. तिकडे शेतकरी नाहीत का? इथे फोटो काढण्यापेक्षा केरळात जाऊन एपीएमसीसाठी आंदोलन करा, एपीएमसीची व्यवस्था जर एवढीच चांगली वाटत आहे तर केरळमध्येही ही व्यवस्था लागू करण्यासाठी आंदोलन का करत नाही? असा सवाल मोदींनी केला. विरोधकांनी खोटं बोलणं सोडावं, शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, दुटप्पी राजकारण करणं सोडा, असंही मोदी म्हणाले.
राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव
शेतकऱ्यांना भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव आहे. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विरोधक लुडबुड करत आहेत. देशातील शेतकरी विरोधकांची ही चाल जाणून आहे. शेतकरी अशा लोकांना थारा देणार नाही, असं सांगतानाच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका, त्यांना संभ्रमित करू नका, निर्दोष शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळू नका, असं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं. आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड सामर्थ्य असूनही केवळ याच लोकांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा विकास होऊ शकला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जींनी शेतकऱ्यांना वंचित ठेवलं
यावेळी मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. पीएम किसान योजनेचा देशातील सर्वच राज्यांनी लाभ घेतला आहे. पण पश्चिम बंगाल सरकारने त्याचा लाभ घेतला नाही. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची योजना रोखून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवलं आहे. केवळ राजकीय स्वार्थासाटी हे चाललं आहे, अशी टीका मोदींनी केली.
Working for the welfare of our hardworking farmers. #PMKisan https://t.co/sqBuBM1png
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2020
बंगाल सरकार विरोधात आंदोलन का नाही?
गेल्या 30 वर्षात बंगालमध्ये सत्ता करणाऱ्या विचारधारेने बंगालची वाट लावली आहे. ममता बॅनर्जींचे 15 वर्षांपूर्वीचे भाषण ऐकल्यावर तुम्हाला कळून येईल. एका विशिष्ट विचारधारेने बंगालची वाट लावली आहे. आता बंगाल सरकार शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेचा लाभही देत नाही. बंगालमध्ये पीएम किसान योजना लागू करण्यात आली नाही, त्याविरोधात विरोधकांनी आंदोलन का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, त्यावर विरोधक गप्प का? बंगालच्या मुद्द्यावर गप्प राह्यचं आणि पंजाबमधील शेतकऱ्यांची दिशाभूल करायची हे कोणतं राजकारण आहे? असा सवालही त्यांनी केला. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)
गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवालhttps://t.co/CHvG38ssi3 #PMKisanSammanNidhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल
(pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)