मोदींना मिळालेलं गिफ्ट तुम्हीही घेऊ शकता! कसं? इथे वाचा… 100 ते 5 लाखांपर्यंत किंमत!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. या वस्तुंच्या किंमती 100 रुपयांपासून सुरू झाल्या असून पाच लाखापर्यंत त्यांची किंमत आहे.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना मिळालेली सर्वात कमी किंमतीची भेटवस्तू (Gifts) या 100 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत आहेत. भेटवस्तुंच्या किंमतीनुसार अडीच कोटींची भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू, नेते, तसेच विविध क्षेत्रातील लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे. या भेटवस्तुंचा लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी मिळणाऱ्या भेटवस्तूंचा दरवर्षी लिलाव होतो. त्यातून मिळणारी रक्कम ही विशिष्ट कामासाठी खर्च केली जाते.
यावेळी करण्यात येणाऱ्या लिलावामध्ये चेन्नई बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील मधुबनी पेंटिंग्जचाही समावेश आहे. नरेंद्र मोदींना मिळालेल्या वस्तुंचा हा चौथ्यांदा लिलाव होणार आहे.
यावर्षी या लिलावामध्ये 1 हजार 222 भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या लिलावामध्ये आधारभूत किंमत निश्चित केल्यानंतर लोकं त्या किंमतीपेक्षा जास्त बोली लावू शकतात.
यामध्ये राष्ट्रकुल, ऑलिम्पिकमधील खेळाडूंनी दिलेल्या भेटवस्तू आहेत. यावेळी विविध कलाकृती, शिल्प यांचाही त्यात समावेश आहे. या लिलावामधून मिळणारा पैसा हा नमामि गंगे प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे. हा लिलाव 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.
यामध्ये सर्वात कमी किंमतीची भेटवस्तू 100 तर 5 लाख रुपयांपर्यंतही वस्तू आहेत. यावेळी सुमारे अडीच कोटींची भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
यामध्ये देशातील भेटवस्तू, भारतीय खेळाडू आणि विविध राज्यातील नेत्यांकडून मिळालेल्या तसेच विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
त्या भेटवस्तू घेण्यासाठी या भेटवस्तूंच्या किंमतीसह सर्व माहिती अधिकृत वेबसाइट pmmementos.gov.in वर उपलब्ध असणार आहे. ते पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले गेले आहे.
पॅरालिम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंकडून मिळालेल्या भेटवस्तूंचाही यामध्ये समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून मिळालेली राणी कमलापतीची भेटही लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सादर केलेली हनुमानजींची मूर्ती आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून मिळालेला त्रिशूळ असो, सर्व भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे.
यामधून मिळणारी रक्कम ही नमामि गंगे या कार्यक्रमाच्या निधीसाठी देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी या लिलावातून सांस्कृतिक मंत्रालयाला सुमारे 16 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. त्यावेळी 1300 हून अधिक वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.