WITT: ‘पीएम नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेतृत्व’; TV9 चे CEO&MD बरुण दास काय म्हणाले?
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे.

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं . त्यानंतर टिव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना बरुण दास यांनी म्हटलं की, माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की,टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ‘इंडिया फर्स्ट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुलमंत्र आहे. 2047 पर्यंत भारताला एक विकसीत देश बनवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने तीन प्रमुख वर्गावर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. ज्यामध्ये भारताचे तरुण, भारतातील नारी शक्ती आणि प्रवासी भारतीय यांचा समावेश आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला नेहमी असं वाटतं की महिलांचं सक्षमीकरण आणि नेतृत्व हे समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतात. आज आपण तरुण आणि प्रवासी भारतीय अशा दोन प्रमुख वर्गावर लक्ष केंद्रीत केलं आहे.प्रवासी भारतीयांबाबत बोलायचं झाल्यास टीव्ही 9 नेटवर्कने गेल्या वर्षी जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये न्यूज़9 ग्लोबल समिट’चं आयोजन केलं होतं. आता सुरू असलेल्या कार्यक्रमाचं देखील भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे.
आज संपूर्ण जग भारताकडे ‘विश्व बंधु ‘अर्थात ग्लोबल फ्रेन्ड म्हणून पाहात आहे. यामध्ये कोणताही संशय नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली आणि सन्माननीय नेते आहेत.नेपोलियन बोनापार्ट ने म्हटलं होतं की, एका नेत्याचं हृदय हे त्याच्या डोक्यामध्ये असायला हवं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सिद्ध केलं आहे. आपल्या नेतृत्वाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलात असं बरुण दास यांनी म्हटलं आहे.