AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No Confidence Motion | अविश्वास प्रस्ताव चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्वाच वक्तव्य

No Confidence Motion | पंतप्रधान मोदींकडून आपल्या पक्षाच्या खासदारांना सेमीफायनल जिंकण्याच्या शुभेच्छा. मोदींनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर घमंडी आघाडी अशी टीका केली.

No Confidence Motion | अविश्वास प्रस्ताव चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्वाच वक्तव्य
PM Narendra ModiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 1:25 PM

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेआधी भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. काँग्रेस प्रणीत विरोधी पक्षांची आघाडी इंडियाला पंतप्रधान मोदी यांनी थेट लक्ष्य केलं. काल राज्यसभेत विरोधी पक्षांनी सेमीफायनल पाहिली. पंतप्रधान मोदींनी आपल्या खासदारांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही सगळ्यांनी सेमीफायनल जिंकली आहे, असं मोदी म्हणाले.

जे लोक सामाजिक न्यायाबद्दल बोलायचे, तेच आज भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टिकरणामुळे सामाजिक न्यायाच मोठ नुकसान करतायत. पंतप्रधान मोदींनी यावेळी करप्शन क्विट इंडिया, परिवारवाद क्विट इंडिया आणि तुष्टिकरण क्विट इंडियाचा नारा दिया.

पंतप्रधान काय म्हणाले?

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही 2018 मध्येच विरोधी पक्षाला हे काम दिलं होतं. आता ते जे काम करतायत. त्यातून त्यांच्यात अविश्वास असल्याच स्पष्ट दिसतय. विरोधी पक्षांनी परस्परांच्या चाचपणी करण्याच्या नादात नो-कॉन्फिडेंस मोशनचा प्रस्ताव आणलाय”

शेवटच्या चेंडूवर सिक्स मारण्याची संधी

पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या आघाडीवर घमंडी आघाडी अशी टीका केली. हा अविश्वास प्रस्ताव तुम्ही शेवटच्या चेंडूवर सिक्स मारण्याची संधी म्हणून घ्या असं पंतप्रधान म्हणाले.

अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी भाजपाला 6 तास

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे. असं झालं नाही, तेव्हा विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वात प्रस्ताव आणला. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान यावर चर्चा होईल. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांची वेळ देण्यात आली आहे. यात 6 तास भाजप आणि 1 तास काँग्रेसला मिळाला आहे. अन्य पक्षांमध्ये बाकीचा वेळ वाटून देण्यात आलाय. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत काय ठरलं?

भाजपा उद्या म्हणजे येत्या 9 ऑगस्टपासून से भ्रष्टाचार क्विट इंडिया, परिवारवाद क्विट इंडिया आणि तुष्टिकरण क्विट इंडिया अभियान चालवणार आहे. यासाठी देशातील प्रत्येक गावातून अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी ही माहिती दिली.