Video : कमी सुरक्षा आणि विना VVIP ट्रिटमेंट निघाला पंतप्रधान मोदींचा ताफा, सामान्य नागरिकांना त्रास नाही!; सोशल मीडियावर कौतुक

दिल्लीवरुन निघताना पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले, त्यावेळी अत्यंत साधेपणाने त्यांचा ताफा दिल्लीवरुन रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी कुठल्याही VVIP रस्त्याचा वापर करण्यात आला नाही. कमी सुरक्षेत मोदींचा ताफा दिल्लीवरुन रवाना झाला. या दरम्यान ट्राफिकमध्ये कुठलीही अडचण आली नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही.

Video : कमी सुरक्षा आणि विना VVIP ट्रिटमेंट निघाला पंतप्रधान मोदींचा ताफा, सामान्य नागरिकांना त्रास नाही!; सोशल मीडियावर कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 4:31 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शिरस्त्याप्रमाणे भारतीय लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. गुरुवारी मोदी नवी दिल्लीवरुन जम्मू-काश्मीरच्या नौशेरा भागात दाखल झाले. दिल्लीवरुन निघताना पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले, त्यावेळी अत्यंत साधेपणाने त्यांचा ताफा दिल्लीवरुन रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी कुठल्याही VVIP रस्त्याचा वापर करण्यात आला नाही. कमी सुरक्षेत मोदींचा ताफा दिल्लीवरुन रवाना झाला. या दरम्यान ट्राफिकमध्ये कुठलीही अडचण आली नाही किंवा सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही. (PM Narendra Modi refuses VVIP treatment, Modi’s convoy leaves Delhi under low security)

पंतप्रधान मोदींच्या ताफ्याचा व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयने ट्वीट केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्राफिक न अडवता, मोदींच्या ताफ्यातील गाड्या एका लाईनमध्ये रस्त्यावरुन जात आहेत. रस्त्यावर लाल सिग्नल लागताच पंतप्रधान मोदींची गाडीही थांबली. सर्वसाधारणपणे पंतप्रधान किंवा तत्सम व्यक्तींच्या ताफा रस्त्यावरुन जात असेल तर हे चित्र पाहायला मिळत नाही. पंतप्रधानांचा ताफा निघतो त्यावेळी रस्ता रिकामा केला जातो. तसंच लोकांना रस्त्याच्या कडेला थांबण्यासही मनाई केली जाते. मात्र, आज पंतप्रधान मोदी यांनी या VVIP ट्रिटमेंटला फाटा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोशल मीडियात मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं जात आहे.

सोशल मीडियावर लोकांचं मत काय?

पंतप्रधान मोदींनी आज VVIP ट्रिटमेंटला फाटा दिला. त्यामुळे मोदींनी VVIP कल्चर संपवल्याचं लोक म्हणत आहेत. मोदी हे सातत्यानं आपला दौरा आणि ताफ्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देत असतात. एप्रिलमध्येही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींच्या ताफ्याने दोन रुग्णवाहिकांना पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला होता. रुग्णवाहिकांना पंतप्रधान मोदींचा ताफा जात असलेल्या रस्त्यावरुनच पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींची जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी यंदा नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवांनाशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांशी संवाद साधला. लष्करातील जवान म्हणजे माझं कुटुंब आहे. या कुटुंबासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे. आधी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी जवानांसोबत दिवाळी साजरी करायचो. आता देशाचा पंतप्रधान म्हणून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतो, असं मोदींनी सांगितलं.

जवान हेच अभेद्य संरक्षण कवच

आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहरा देत असतात. त्यामुळेच संपूर्ण देश सुखाची झोप घेत आहे. आपले जवान म्हणजेच आपलं अभेद्य असं संरक्षण कवच आहे. त्यांच्यामुळेच देशात शांती आणि सुरक्षा बनलेली आहे. आपले जवान म्हणजे त्याग आणि शौर्याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत, असे गौरवोद्गागारही त्यांनी काढले. तुमच्याकडून ऊर्जा, नवी उमेद आणि नवा विश्वास घेण्यासाठी मी आज पुन्हा आलो आहे. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो नाही. तर 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या काळात येथील ब्रिगेडने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यावर देशाला आजही अभिमान वाटतो, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका

PM Narendra Modi refuses VVIP treatment, Modi’s convoy leaves Delhi under low security

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.