Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली, सांगितले ‘ते’ सिक्रेट

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली. विरोधी पक्षाचे नेते ज्यांच्याबद्दल चुकीचा विचार करतात त्यांचं नेहमी चांगलंच होतं. याबाबत विरोधी पक्षांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली, सांगितले 'ते' सिक्रेट
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 6:35 PM

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : विरोधी पक्षांनी लोकसभेत सादर केलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाषण केलं. नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली. “विरोधी पक्षांच्या लोकांना एक सिक्रेट वरदान मिळालं आहे. हे वरदान म्हणजे हे लोकं ज्यांचा वाईट विचार करतात त्यांचं भलंच होतं. एक उदाहरण तर तुम्ही पहा मी इथेच आहे. २० वर्ष झाले, काय झालं नाही, पण भलंच झालं, तुम्हाला ते सिक्रेट वरदान आहे”, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

“गेल्या तीन दिवसांपासून आमच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी मनापासून डिक्शनरी खोलून जेवढे अपशब्द वापरता येतील तेवढ्या शब्दांचा प्रयोग केला. त्यांचं मन आता हलकं झालं असेल. ते मला दिवस-रात्र कोसत असतात. त्यांच्यासाठी मोदी तेरी कब्र खुदेगी, हा त्यांचा सर्वात प्रिय नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे अपशब्द हे टॉनिक आहेत. ते असं का करतात, हे का होतं? आज मी सदनमध्ये काही सिक्रेट सांगणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘विरोधकांनी बँकिंग सेक्टर डुबून जाईल म्हटलं, पण…’

“या लोकांनी बँकिंग सेक्टर डुबून जाईल, असं म्हटलं होतं. अनेक विद्वानांना विदेशातून आणत होते. त्यांच्या तोंडून बोलून दाखवत होते. याबाबत अफवा पसरवण्याचं काम केलं. पण जेव्हा यांनी बँकांबद्दल चुकीचा विचार केला तेव्हा आमच्या पब्लिक सेक्टर बँक्सचा नेट प्रॉफिट दोन टक्क्यांनी जास्त झाला”, असं मोदी म्हणाले.

“या लोकांनी फोन बँकिंग घोटाळाचा आरोप केला. या कारणास्तव देशाला एनपीएच्या गंभीर संकटात डुबवलं होतं. गेल्या दिवसांची गोष्ट होत आहे. एनपीएचा जो नंबर लावला होता त्याला पार करुन नवं प्रॉफिट मिळवलं आहे”, असं मोदी म्हणाले. “आमच्या सुरक्षा विभागात हेलिकॉप्टर बनवणारी एचएएल कंपनीबाबत चुकीचं बोललं गेलं होतं. एचएएल संपलं आहे, असा दावा केला जात होतो. भारताचा सुरक्षा विभाग संपलं आहे, असं बोलत होते”, असं मोदी म्हणाले.

‘एचएएल कंपनीबद्दल चुकीचे आरोप केले आणि आज…’

“आता शेतात जावून व्हिडीओ शूट होतो तसंच त्यावेळी एचएएल फॅक्टरीच्या दरवाज्यावर मजदूरांची सभा भरवून व्हिडीओ बनवला गेला होता. त्यांना सांगितलं गेलं होतं की, आता तुम्हाला भविष्य नाही. तुमचे मुलं उपाशी राहतील. एचएएल डुबत आहे. देशाच्या या महत्त्वपूर्ण इंडस्ट्रीला इतकं वाईट म्हटलं की त्या सिक्रेटमुळे आज एचएएल नव्या यशाची भरारी घेत आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांना भडकवल्यानंतरही आज एचएएल देशाची शान बनली आहे”, असं मोदी म्हणाले.

“एलआयसीला काय-काय म्हटलं गेलं होतं. एलआयसी बरबाद झालीय. गरिबांचे पैसे डुबत आहेत. गरीब कुठे जातील, त्यांनी मेहनतीने पैसे गुंतवले होते. सर्व कल्पनाशक्ती वापरुन बोलत होते. पण आज एलआयसी मजबूत होतेय. शेअर मार्केटमध्येही हिचा छाप आहे. शेअर मार्केटमध्ये ज्यांना रुची आहे त्यांनी सरकारच्या यंत्रणावर टीका होते त्यावर पैसे लावा. तुम्हाला निश्चित फायदा होईल”, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

“हे लोक ज्या संस्थांच्या मृत्यूची घोषणा करतात त्या संस्थांचं भाग्य चमकतं. मला विश्लास आहे हे जसे देशाला कोसत आहेत, मला विश्वास आहे, लोकशाही मजबूत होणार आहे, देश मजबूत होणार आहे”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.