Narendra Modi Speech : ‘स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला…’ लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींचं महत्त्वाचं विधान
Independence Day: आज देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.
नवी दिल्ली : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. “स्वातंत्र्यानंतर जन्मलेला मी पहिला व्यक्ती ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली आहे, याचा आनंद वाटतोय. शिवाय ही मोठी जबाबदारी असल्याचं मी मानतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.
भारत लोकशाहीची जननी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेली मी पहिली व्यक्ती आहे. मी देशाचा पंतप्रधान म्हणून बोलतोय. पण मी या देशातील जनतेचं दु:ख: जानतो. मी जितंक तुमच्याकडून शिकलोय तितकंच मी तुम्हाला ओळखतोय. तुमच्या सुख-दु:ख शी मी परिचीत आहे. ते दु:ख दूर करण्यासाठी मी कायम प्रयत्नसील करेन. त्यासाठी मी संपूर्ण वेळ द्यायला तयार आहे. शेवटच्या माणसाला फायदा व्हावा, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वप्न होतं. मी माझे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आहे, असंही मोदी म्हणालेत.
महापुरुषांची आठवण
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा.सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये तसेच देशाच्या जडघडणीमध्ये मोठे योगदान आहे. आज त्यांचे स्मरण करून आभार मानायचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पीत केले. स्वातंत्र्य हाच त्यांचा ध्यास होता. अशा महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र दिवस आहे.देशाने गेल्या 75 वर्षांत अनेक संकटांचा सामना केला. मात्र या सर्व संकटांवर मात करत आज भारत पुढे आला आहे,असंही मोदी म्हणालेत.
‘आझादी का अमृत महोत्सव’ देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे.