BREAKING: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रीही लस घेणार; केंद्राचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. (Modi to get Covid-19 vaccine shot in second stage of vaccination)
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. (Modi to get Covid-19 vaccine shot in second stage of vaccination)
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वयाच्या 50 च्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात स्वत: मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही लस टोचून घेणार आहेत.
दुसऱ्या टप्प्याची तारीख लवकरच
देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. यावेळी कोरोना काळात दिवस रात्र जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यात लष्कर, अर्धसैनिक दलाचे जवानांनाही लस देण्यात येणार आहे. दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात पन्नाशीच्या पुढच्या नागरिकांसह पंतप्रधानांसह, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि बहुतेक राज्यांचे मुख्यमंत्री लस टोचून घेणार आहेत. शिवाय अनेक व्हीआयपींनाही कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे.
दिल्ली, पंजाबमध्ये अल्प प्रतिसाद
कोणत्या टप्प्यात कोणती लस टोचायची हे राज्य सरकारने ठरवायचं असल्याचं केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर दिल्ली आणि पंजाबसहित अनेक राज्यातील लोक लस घेण्यात टाळाटाळ करताना दिसत असून त्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे. (Modi to get Covid-19 vaccine shot in second stage of vaccination)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/WZRhGyp9a5
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या लशीबाबात भीती बाळगू नका; केंद्र सरकारनं परवानगी दिली मी आत्ता लगेच लस घेईन: राजेश टोपे
कोरोनाच्या भीतीने गरजेपेक्षा अधिक वेळा हात धुताय? होऊ शकते त्वचेचे नुकसान!
(Modi to get Covid-19 vaccine shot in second stage of vaccination)