AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातलं सर्वात लांब रिव्हर क्रूज, 51 दिवसांचा आलिशान प्रवास,  ‘गंगा विलास’चं उद्घाटन आज PM मोदी यांच्या हस्ते,  वाचा सविस्तर..

आज 13 जानेवारी रोजी हे जहाज वाराणसी येथून रवाना होईल. 51 दिवसांचा प्रवास करून पुन्हा आसाम राज्यातील डिब्रूगढमध्ये पोहोचेल.

जगातलं सर्वात लांब रिव्हर क्रूज, 51 दिवसांचा आलिशान प्रवास,  'गंगा विलास'चं उद्घाटन आज PM मोदी यांच्या हस्ते,  वाचा सविस्तर..
Image Credit source: social media
| Updated on: Jan 13, 2023 | 9:18 AM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज जगातील सर्वात लांबीच्या क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. फाइव्ह स्टार हॉटेलच्या सुविधा असलेल्या या क्रूजचं नाव गंगाविलास (Gangavilas)आहे. वाराणसी येथून गंगाविलास क्रूजचा प्रवास आज सुरु होईल. वाराणसीतील (Varanasi) रविदास घाट येथून पुढे बिहार, बंगालच्या मार्गाने हे क्रूज बांग्लादेश, त्यानंतर आसाममधील डिब्रूगढला पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हर्चुअल पद्धतीने या क्रूजचं उद्घाटन करतील.

क्रूजची वैशिष्ट्य काय?

  •  गंगासागर क्रूज तब्बल 51 दिवसांचा प्रवास करणार आहे. भारत आणि बांग्लादेशमधील 27 रिव्हर सिस्टिम आणि सात नद्यांतून हे जहाज प्रवास करेल.
  • गंगा, भागीरथी, मेघना, हुबळी, जमुना, पद्मा आणि ब्रह्मपुत्रा या सात नद्यांचा समावेश यात आहे.
  •  जहाजाच्या या प्रवासात 50 पर्यटन स्थळ जोडले जातील.
  • हे जहाज 62.5 मीटर लांब, 12.8 मीटर रुंद आणि 1.35 मीटर खोल आहे.
  •  स्वदेशी तंत्रज्ञान आणि फर्निचर असलेले हे एकमेव जहाज असल्याचं क्रूजचे संचालक राज सिंह यांनी सांगितलं. भारतातील आर्ट हिस्टोरियन डॉ. अन्नपूर्णा गर्रीमाला यांनी या क्रूजचे डिझाइन केले आहे.
  •  हे क्रूज कोलकाता येथील एका शिपयार्डमध्ये तयार करण्यात आले आहे. २०२० मध्येच खरंतर याची निर्मिती झाली होती, मात्र कोरोना संकटामुळे त्याचं उद्घाटन झालं नव्हतं.
  •  3 मजली जहाजात जवळपास 18 सूट म्हणजेच लक्झरी खोल्या आहेत.
  •  खोलीत कन्व्हर्टेबल बेड, फ्रेंड बालकनी, एअर कंडिशनर, सोफा, एलईडी टीव्ही, स्मोक अलार्म, अटॅच बाथरुम यासारख्या अनेक सुविधा आहेत.

Gangavilas

जहाजाचा मार्ग कसा?

आज 13 जानेवारी रोजी हे जहाज वाराणसी येथून रवाना होईल. 51 दिवसांचा प्रवास करून पुन्हा आसाम राज्यातील डिब्रूगढमध्ये पोहोचेल. – या प्रवासात भारतातली पाच राज्य- उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम तसेच बांग्लादेशातूनही प्रवास करेल. बांग्लादेशमध्ये हे जहाज 15 दिवस थांबेल.

तिकिट काय?

जगातील सर्वाधिक लांबीच्या रिव्हर क्रूजच्या पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक असतील. जहाजात एकूण ३६ प्रवासी राहण्याची सुविधा आहे.

जहाजात प्रति व्यक्ती 50 हजार रुपये प्रति दिवस असे तिकिट आकारण्यात येत आहे. पण एकदाच 51 दिवसांसाठी बुकिंग करणे अनिवार्य आहे. गरज पडली तर हा प्रवास सोडून जाता येईल.

या क्रूजमध्ये नदी पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.