Omicron Variant: आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत पुढे ढकलणार? पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
वेगाने पसरणाऱ्या नवीन व्हेरीयंटमुळे, भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर “हाई रिस्क ” देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. Omicron व्हेरीयंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना, इस्रायल आणि बेल्जियममध्ये पसरला आहे.
नवी दिल्लीः कोविडची महामारी सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी, जग आता नवीन कोरोनाव्हायरस प्रकार, B.1.1.529 किंवा Omicron व्हेरीयंटचा सामना करत आहे, जो डेल्टा व्हेरियंटपेक्षाही अधिक धोकादायक आहे. देशातील कोविड परिस्थिती तसेच देशव्यापी लसीकरण मोहिमेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काल, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron ला अत्यंत संक्रामक व्हायरस म्हणून वर्गीकृत केले आहे. यानंतर भारतासह अनेक देश Omicron व्हेरीयंटने प्रभावित देशांच्या प्रवासावर निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
PM Narendra Modi chairs meeting with top govt officials on COVID-19 situation & vaccination; Cabinet Secretary Rajiv Gauba, Principal Secretary to PM, PK Mishra, Union Health Secretary Rajesh Bhushan & NITI Aayog member (health) Dr VK Paul are among the attendees
(Photo: PMO) pic.twitter.com/u4keTTDlwx
— ANI (@ANI) November 27, 2021
कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल उपस्थित होते, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थित होते.
वेगाने पसरणाऱ्या नवीन व्हेरीयंटमुळे, भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर “हाई रिस्क ” देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. Omicron व्हेरीयंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना, इस्रायल आणि बेल्जियममध्ये पसरला आहे.
I urge Hon’ble PM to stop flights from those countries which are affected by new variant. With great difficulty, our country has recovered from Corona. We shud do everything possible to prevent this new variant from entering India https://t.co/5LpFULIHKb
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 27, 2021
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Omicron व्हेरीयंट बाधीत देशांमधले सर्व उड्डाणे बंद करण्याचे आवाहन केले. मोठ्या कष्टाने आपला देश कोरोनापासून सावरला आहे. हा नवीन प्रकार भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, ते म्हणाला.
विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की 15 डिसेंबर 2021 पासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होतील. पण, काही देशांमध्ये नव्याने कोविडचा उद्रेक झाल्यामुळे, 14 देशांना वगळण्यात आले. त्या देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
हे ही वाचा