PM Security Breach: पंजाब पोलिसांकडून गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बुक नियमांकडे कानाडोळा; केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवलं बोट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली होती. त्यामुळे मोदींना हा दौरा अर्ध्यावरच टाकून परतावे लागले आहे. आता या प्रकरणात नवीन माहिती आली आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली होती. त्यामुळे मोदींना हा दौरा अर्ध्यावरच टाकून परतावे लागले आहे. आता या प्रकरणात नवीन माहिती आली आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी निदर्शने होणार असल्याचे इनपुट गुप्तचर विभागाने दिले होते. पण पंजाब पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तसेच ब्ल्यू बुक नियमांकडेही कानाडोळा केला असल्याचं गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्ल्यू बुकनुसार, राज्य पोलिसांना कोणतीही प्रतिकूल परिस्थिती दिसून आल्यास, त्यावेळी एक पर्यायी आकस्मिक मार्ग तयार ठेवायचा असतो. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी सातत्याने पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते. तसेच पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत माहिती देण्यात आली होती. पंजाब पोलिसांनीही सुरक्षेची संपूर्ण हमी दिली होती.
इतर सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारचीच
एसपीजीचे जवान पंतप्रधानांच्या सुरक्षेत असतात. मात्र, तरीही इतर सुरक्षेच्या उपायांची जबाबदारी राज्य सरकारच्या हातात असते. तसेच वारंवार होणाऱ्या बदलांची माहिती राज्य पोलिसांकडून एसपीजीला दिली जाते. त्यानुसार व्हीव्हीआयपी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो. त्यात बदल केला जातो, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
काल काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022https://t.co/n5auhcslqG#corona | #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2022
संबंधित बातम्या:
PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका
पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, फिरोजपूरचा एसएसपी निलंबित; पंजाब सरकारची तडकाफडकी कारवाई