POK : ‘पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होईल’, केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने पाकिस्तानात पण खळबळ

POK : काही काळ कळ सोसा, पाकिस्ताने कब्जा केलेला काश्मीर सुद्धा भारतात विलीन होईल. काही काळ वाट पाहा, असे वक्तव्य भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे. अर्थात या दाव्यामुळे भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये पण खळबळ उडाली आहे. जी-20 परिषदेमुळे भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा त्यांनी केला.

POK : 'पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होईल', केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने पाकिस्तानात पण खळबळ
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 6:01 PM

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : थोडं थांबा, पीओके (POK) आपोआप भारतात सामील होईल, असं वक्तव्य भारताच्या केंद्रीय मंत्र्याने केले आहे. काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. 1947 मधील घडामोडींमुळे त्यातील काही भागावर पाकिस्ताने कब्जा केला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय संघटना या भागाला पाकव्याप्त काश्मीर या नावाने ओळखतात. अर्थात काश्मीरच्या राजाने भारतात विलीन होण्याच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तरीही अनेक दशकांपासून हा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. पाकिस्तानने अनाधिकृत कब्जा केलेल्या काश्मीरमध्ये एक कठपुतळी सरकार बसवले आहे. पण सध्या या भागातील नागरीक पाकिस्तानविरोधात (Pakistan) पेटलेले आहेत. गेल्या आठवड्यात भारतात विलीन होण्यासाठी तिथे मोर्चा पण काढण्यात आला होता. काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्करावर हल्ले पण वाढले आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग (V. K. Singh) यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये पण त्यामुळे चर्चा झडली आहे.

काय म्हणाले सिंग

केंद्रीय राज्य मंत्री व्ही. के. सिंग सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. राजस्थानमध्ये निवडणुकांचे पडघम वाजत आहे. दौसा येथे सोमवारी परिवर्तन संकल्प यात्रा काढण्यात आली. त्यादरम्यान त्यांनी पीओके आपोआप भारतात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केले. थोडा वेळ थांबा, पीओके भारतात विलीन होईल असे ते म्हणाले. पीओकेतील शिया मुस्लीम भारतात जाण्यासाठीचा रस्ता उघडण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पाकिस्तानसह भारतात लागलीच प्रतिक्रिया उमटल्या. समाज माध्यमांवर याविषयीची जोरदार चर्चा रंगली आहे. काहींना हा निवडणूक स्टंट वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

अशी उडाली ठिणगी

इंग्रज भारत सोडून जाताना येथे संस्थाने होती. त्यातील अनेकांनी लागलीच भारतात विनाशर्त विलीन होण्याचा निर्णय घेतला. तर निजाम, जुनागड नंतर सहभागी झाले. काश्मीरच्या राजाने निर्णय घेण्यास उशीर केला. तिथल्या राजाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तान पुरस्कृत टोळ्यांनी आक्रमण करण्यास सुरुवात केल्याने राजा हरीसिंह यांनी तातडीने भारतात विलिनीकरणासाठी स्वाक्षरी केली. हा मुद्दा युनोत गेला. पाकिस्तानने काश्मीरवरील कब्जा सोडला नाही. तिथे एक नामधारी सरकार, निवडणुकीचा फार्स पाकिस्तान करतो. पण आता पाकिस्तानच्या या धोरणाचा स्थानिक नागरिकांनाच वीट आला आहे.

पंतप्रधानांच्या करिष्म्यावर निवडणूक

राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा कोण चेहरा असेल, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. भाजप मुख्यमंत्र्याची घोषणा करत नाही तर पंतप्रधानांच्या करिष्म्यावर निवडणूक लढवते, असे उत्तर त्यांनी दिले. पक्ष योग्य उमेदवारांना संधी देईल, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.