आता चिनी रणगाड्यांची खैर नाही!, पोखरणमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘नाग’ची चाचणी यशस्वी

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असलेल्या 'नाग'ची यशस्वी चाचणी आज सकाळी पोखरण इथं पार पडली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOकडून सकाळी 6.45 वाजता पोखरणच्या आर्मी रेंजवर ही चाचणी घेण्यात आली.

आता चिनी रणगाड्यांची खैर नाही!, पोखरणमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र 'नाग'ची चाचणी यशस्वी
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:44 AM

पोखरण: संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं भारतीय सैन्याला अजून एक मोठं यश प्राप्त झालं आहे. आज पहाटे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘नाग’ची यशस्वी चाचणी पार पडली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOकडून सकाळी 6.45 वाजता पोखरणच्या आर्मी रेंजवर ही चाचणी पार पजली. वॉटरहेडसह या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ( NAG anti tank missile test is successful)

नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. DRDOकडून यापूर्वीही नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. 2017, 2018, आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या चाचण्या पार पडल्या होत्या. नाग क्षेपणास्त्राची रेंज 4 किलोमीटरची आहे. हे क्षेपणास्त्र खांद्यावरुनही डागता येतं. ‘नाग’ क्षेपणास्त्राची आज एकूण दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे भारतीय लष्करात हे क्षेपणास्त्र लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.

भारत-चीन दरम्यान लडाखमध्ये जी तणावाची स्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी महत्वपूर्ण मानली जात होती. पूर्व लडाख सीमेजवळ भाजप आणि चीन लष्कराचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये आहेत.

हेलिकॉप्टरमधून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राचीही चाचणी

नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यापूर्वी 19 ऑक्टोबरला बालासोर इथं स्टँड ऑफ अँटी टँक मिसाईलची चाचणी करण्यात आली होती. तब्बल 10 किलोमीटरवरील रणगाडा उडवण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. हे क्षेपणास्त्र भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर बसवण्यात येईल.

‘आयएनएस कवरत्ती’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात

भारतीय सैन्य प्रमुख जनरल एम.एम नरवणे आज विशाखापट्टणम इथं ‘आयएनएस कवरत्ती’ ही युद्धनौका नौदलाला सुपूर्द करणार आहेत. त्यामुळं भारतीय नौदलाची ताकद अजून वाढणार आहे. ‘आयएनएस कवरत्ती’ प्रोजेक्ट-28 अंतर्गत पूर्णपणे भारतीय बनावटीची पानबुडी विरोधी युद्धनौका आहे. ‘आयएनएस कवरत्ती’मधील 90 टक्के यंत्रणा ही पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. महत्वाची बाब म्हणजे या युद्धनौकेच्या सुपरस्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी कार्बन कंपोझिटचा उपयोग करण्यात आला आहे. जो भारतीय युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात मोठं यश मानलं जात आहे.

संबंधित बातम्या:

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस कवरत्ती’, पाणबुडीविरोधी युद्धनौका निर्मितीमध्ये भारताला मोठं यश

INS खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल, सायलन्ट किलरने ताकद वाढणार

NAG anti tank missile test is successful

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.