Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे
प्रियकां गांधींना यूपी पोलिसांच्या चांगलीच खरडपट्टी काढली. पोलिसांना थेट आव्हान देत, अंगाला हात तर लावून दाखवा, कायदा आम्हालाही कळतो म्हणत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanaka Gandhi) आणि यूपी पोलिसांमध्ये (UP Police) रविवारी रात्री चांगलाच वाद झालेला पाहायला मिळाला. त्यावेळी प्रियकां गांधींना यूपी पोलिसांच्या चांगलीच खरडपट्टी काढली. पोलिसांना थेट आव्हान देत, अंगाला हात तर लावून दाखवा, कायदा आम्हालाही कळतो म्हणत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं. त्याचं झालं असं की, प्रियंका गांधी वाड्रा ह्या लखीमपूर आंदोलनता (Lakhimpuri Violence) मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना भेटण्यासाठी लखीमपूर खीरीकडे रवाना झाल्या. मात्र, त्यांना हरगावजवळ यूपी पोलिसांना ताब्यात घेतलं, आणि नंतर सीतापूर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं, त्याचदरम्यान, पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये (uttar pradesh congress) धक्काबुक्की झाली. प्रियंका गांधींनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. ( policemen-stopped-priyanka-gandhi-from-going-to-lakhimpur-priyanka-said-first-bring-warrant-Lakhimpur Kheri Violence )
मिळालेल्या माहितीनुरा, प्रियंका सकाळी 6 वाजता लखीमपूरच्या सीमेवर पोहचल्या, प्रियंका गांधी पोहचणार असल्याची माहिती आधीपासूनच पोलिसांकडे होते, त्यामुळे पोलिसांनी प्रियंका गांधींच्या गाडीला हरगावजवळ अडवलं. त्यानंतर त्यांना सीतापूर पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. त्या दरम्यान पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला. दरम्यान, याचवेळी प्रियंका गांधींनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याचाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्या प्रियंका गांधी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहेत.
“अंगाला हात तर लावू दाखवा!”
प्रियंका गांधी एका पोलिस अधिकाऱ्याला म्हणाल्या, ” तुम्ही ज्याप्रकारे मला धक्का मारला, मला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, जो फिजिकल असॉल्ट, अपहरण करण्याचा प्रयत्न, किंवा अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये येतो. मला सगळं कळतं, अंगाला हात तर लाऊन दाखवा, जाऊन तुमच्या अधिकारी, मंत्र्यांकडून माझ्या अटकेचा वॉरंट घेऊन या.” दरम्यान याचवेळी प्रियंका म्हणाल्या की, “मला अटक करण्यासाठी महिलांना पुढं करु नका, आधी महिलांसोबत कसं बोलायचं असतं हे शिकून घ्या”
पाहा व्हिडीओ:
Under #YogiAdityanath Govt, criminals enjoy protection & our leader @priyankagandhi Ji is stopped from meeting the families of the Farmers who were brutally killed.
When’ll the #UPPolice act against the criminals?#lakhimpurkhiri#लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/xCitd2fh0O
— Aslam Shaikh, INC ?? (@AslamShaikh_MLA) October 4, 2021
पुढं प्रियंका म्हणाल्या की, ” अंगाला हात तर लावून दाखवा, तुमच्या राज्यात नसेल, पण देशात कायद्याचं राज्य आहे, आम्हाला ताब्यात घ्यायचं असेल तर घ्या, पण तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही” हेच नाही तर प्रियंकांनी विनावॉरंट अटकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्या म्हणाल्या, ” मला वॉरंट दाखवा, जर वॉरंट नसेल तर तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, तुम्ही काय समजता स्वत:ला, लोकांना मारु शकता, शेतकऱ्यांना चिरडू शकता, तर आता समजत आहात की आम्हालाही थांबवू शकता”
दरम्यान, प्रियंका यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियंकांच्या या व्हिडीओनंतर यूपी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं निर्माण केलं जात आहे. कुठलाही वॉरंट नसताना यूपी पोलीस प्रियंका गांधींना ताब्यात घेत होते, ते करताना धक्काबुक्कीही केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा: