Pragya Singh Thakur | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा चर्चेत, म्हणतात कमी दारु पिणं औषधासारखं, आयुर्वेदाचा दिला दाखला
ठाकूर यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणत सेवन केल्यास दारु औषधासारखी असते, असे अजब तर्कट प्रज्ञा ठाकूर यांनी मांडले आहे. दारुबद्दल बोलताना त्यांनी थेट आयु्र्वेदाचा दाखला दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवी दिल्ली : भाजप(BJP) खासदार तथा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे तर मोठा वाद निर्माण झालेला आहे. यावेळी मात्र ठाकूर यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणत सेवन केल्यास दारु (Alcohol) औषधासारखी असते, असे अजब तर्कट प्रज्ञा ठाकूर यांनी मांडले आहे. दारुबद्दल बोलताना त्यांनी थेट आयु्र्वेदाचा दाखला दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर नेमकं काय म्हणाल्या ?
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर माध्यमांशी संवाद साधत होत्या. यावेळी पत्रकारांच्या दारुबद्दलच्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. “दारु स्वस्त असो की महाग. आयुर्वेदामध्ये दारु म्हणजेच अल्कोहोल कमी प्रमाणात असेल तर ते औषध असतं आणि दारुचे प्रमाण असिमित असेल तर ते विष असते. या गोष्टीला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जास्त प्रमाणात दारुचे सेवन करणाऱ्यांनी ते बंद केलं पाहिजे,” असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
अजानमुळे लोकांचा रक्तदाब वाढतो
दरम्यान, याआधी प्रज्ञा ठाकूर यांनी मशिदीमधील अजानला विरोध केला होता. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगात केवळ सनातन धर्म आहे. अजानमुळे लोकांची केवळ झोपच मोडत नाही तर रक्तदाबही वाढतो. सकाळी पूजा-अर्चना केली जाते. तसेच सकळी ध्यान साधना करणाऱ्यांना याचा त्रास होतो, असं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत सविस्तर वृत्त दिलेले आहे.
याआधी त्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरावर अजब तर्क मांडला होता. पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र तसे काही नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची ती मानसिकता आहे, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या होत्या.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Video : स्वच्छ पाण्यात एवढे मोठे मासे पाहिलेत? पर्यटकांनी माशांसोबत केलं कयाकिंग
तुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा !!
Vastu Tips : या गोष्टी घरात ठेवल्याने येते नकारात्मकता, या वस्तू काढा घराबाहेर