राज्यसभेत संजय सिंग प्रकाश जावडेकर The Kashmir Files वरुन आमने सामने, टॅक्स फ्रीच्या मुद्यावर जावडेकरांनी AAP ला घेरलं
भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या काश्मीर फाईल्सवरुन चांगलीच चर्चा रंगली.
नवी दिल्ली: भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांच्यात काश्मीर फाईल्सवरुन चांगलीच खडाजंगी झाली. आपचे खासदार संजय सिंग यांनी काश्मीर फाईल्स दूरदर्शन वरुन दाखवण्याची आणि यूट्यूबवर अपलोड करावा असं म्हटलं. तर, प्रकाश जावडेकर यांनी यांनी काश्मीर फाईल्स प्रत्येकानं बघावं असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही दिल्लीत टॅक्स फ्री का करत नाही, असा सवाल प्रकाश जावडेकर यांनी संजय सिंग यांना केलाय. प्रकाश जावडेकर यांनी आम आदमी पार्टीवर टीका करताना ही एक पार्टी आहे जी दिल्लीत राम मंदिर बांधते मात्र अयोध्येत राम मंदिराला विरोध करते, असं म्हटलं.
संजय सिंग काय म्हणाले?
संजय सिंग यांनी काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून पळवून लावण्यात आलं त्यावेळी भाजप मूकदर्शक बनल्याचा आरोप केला. तर 1989 मध्ये ज्यावेळी काश्मीरी पंडितांना हटवण्यात आलं त्यावेळी केंद्रात भाजप सत्तेत होता. त्यावेळी ते मूकदर्शक बनले होते. तुमच्या पक्षाचे जगमोहन हे काश्मीरचे राज्यपाल होते, असा आरोप संजय सिंग यांनी केला.
पाहा व्हिडीओ
प्रकाश जावडेकर यांचं प्रत्युत्तर
भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी व्ही सिंग यांच्या काळात जगमोहन काश्मीरचे राज्यपाल असल्याचं म्हटलं जातंय. मात्र इंदिरा गांधीयांनी त्यांची जगमोहन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. नंतर ते भाजपमध्ये आले, असा दावा जावडेकर यांनी केला. जगमोहन यांनी फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असताना काश्मीरी पंडितांविरोधात कशी मोहीम राबवली गेल्याचं लिहून ठेवलंय, असं जावडेकर म्हणाले. यासीन मलिक त्या कटाचा सूत्रधार होता. त्याचा सत्कार कोणी केला, असा सवाल देखील प्रकाश जावडेकर यांनी केला. प्रकाश जावडेकर यांनी जेएनयू विद्यापीठातील कथित घोषणांचा देखील भाषणात उल्लेख केला.
भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी काश्मीर फाईल्सबद्दल विषय माडंला होता. त्यावरुन आपचे संजय सिंग आणि प्रकाश जावडेकर आमने सामने आले होते.
इतर बातम्या:
Satara Crime : साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद
Prakash Javadekar gave answer to AAP MP Sanjay Singh demand to upload The Kashmir Files on You tube