Monsoon : विदर्भासह मुंबई उपनगरात पावसाची हजेरी, राज्यातील चित्र काय ? जाणून घ्या दोन मिनिटांमध्ये?

कोकणात दाखल झालेला पाऊस सर्वात आगोदर मुंबई आणि उपनगरात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर अपेक्षित पाऊस झाला नसला तरी रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि वांद्रे भागात सकाळच्या प्रहरीच अर्धा तास पाऊस बरसला.

Monsoon : विदर्भासह मुंबई उपनगरात पावसाची हजेरी, राज्यातील चित्र काय ? जाणून घ्या दोन मिनिटांमध्ये?
मान्सून आता परतीच्या वाटेवर आहे.
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 11:01 AM

मुंबई : सातत्याने पावसाच्या हुलकावणीनंतर (Met department) हवामान विभागाच्या अंदाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता चित्र बदलत आहे. मान्सून केवळ सक्रीयच होत नाहीतर तो बरसतही आहे. आतापर्यंत (Maharashtra Monsoon) राज्यातील मुख्यत्वे कोकण, मुंबई उपनगरे, उत्तर महाराष्ट्र आणि आता दोन दिवसांपासून विदर्भात (Rain) पावसाने हजेरी लावली आहे. यंदा नियमित वेळेपेक्षा तीन आगोदर दाखल झालेल्या पावसाचा वेग सुरवात होताच मंदावला होता. त्यामुळेच जून महिना अंतिम टप्प्यात असतनाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावाड्याची प्रतिक्षा ही कामय आहे. आता मात्र, हवामान विभागाचा अंदाज सत्यात उतरताना दिसत आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत तर पावसाने दणका दिला आहेच पण प्रतिक्षेत असलेल्या विदर्भालाही सुखावले आहे.

राज्याच्या राजधानीत दणक्यात पाऊस

कोकणात दाखल झालेला पाऊस सर्वात आगोदर मुंबई आणि उपनगरात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर अपेक्षित पाऊस झाला नसला तरी रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि वांद्रे भागात सकाळच्या प्रहरीच अर्धा तास पाऊस बरसला. शिवाय आकाशात ढग दाटून आले होते तर सरी मागून सरी ह्या बरसत असल्याने मुंबईकरांसाठी रविवार हा पावसाचा दिवस ठरत आहे.

वसई विरारमध्ये दाटले ढग, मुसळधार पावसाची शक्यता

वसई विरार येथील नालासोपाऱ्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसामध्ये सातत्य नसले तरी काळेकुट्ट ढगामुळे अंधारमय वातावरण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. पण आता चित्र बदलत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे रविवारी सकाळपासूनच वातावऱणात बदल झाला आहे. सकाळपासूनच विरारमध्ये पावसाला सुरवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नागपुरातील बळीराजा सुखावला

नागपुरात समाधान कारक अशा पावसाने हजेरी लावत जणू काही पेरणीच्या कामाला लागा अशा सूचनाच दिल्या आहेत. शनिवारी रात्री जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सह पाऊस झाला.शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे शहराचा विचार केला तर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरण

मराठवाड्यात नांदेड आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नांदेडमध्ये 37 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर उर्वरित मराठवाडा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. असे असले तरी आठवड्याचा शेवट आणि सुरवात देखील आकाशाकडे बघतच करावी लागणार आहे. कारण या दोन दिवसांमध्ये केळ ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रावरही अवकृपाच

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर हंगामाच्या सुरवातीपासूनच मान्सूनची अवकृपा राहिलेली आहे. तीच अजून काही दिवस कायम राहणार असल्याचे अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तो ही रिमझिम पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

आगामी चार दिवसांचे चित्र काय ?

आगामी चार दिवसांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्यातही अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे तर शनिवारी मडगाव, मुरगाव, वैभववाडी, माणगाव, पेण, अलिबाग तर विदर्भातील देसाईगंज, ब्रम्हपूरी, मोरगाव, कोरची व मराठवाड्यातील निलंगा, अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. चार दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.