नवी दिल्ली: पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहून गेली. त्यामुळे मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या प्रकारावर त्यांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर मोदी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून कालच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता मोदी थेट राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतीचीची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहणे ही गंभीर चूक असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंजाबच्या राज्यपालांकडून घटनेचा अहवाल मागून घेण्याची शक्यता आहे. राज्यपालांचा अहवाल आल्यानंतरच ते पुढील निर्णय घेतील, असंही सूत्रांनी सांगितलं.
काल मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022https://t.co/n5auhcslqG#corona | #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2022
संबंधित बातम्या:
PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका
सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे..!