Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election 2022 : भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार? पाच नावं चर्चेत, कुणाचं पारडं जड? वाचा

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना बहुमान मिळाला होता. आता असाच बहुमान दुसऱ्या महिलेला मिळणार का? हेही पाहणं तितकेच म्हत्वाचं आहे. मात्र आता भाजप कुणाच्या नावासाठी पुढकार घेतं? त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

Presidential Election 2022 : भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार? पाच नावं चर्चेत, कुणाचं पारडं जड? वाचा
भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार? Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:39 PM

नवी दिल्ली : देशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका (Presidential Election 2022)घोषित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 21 जुलैपर्यंत देशाला नवे राष्ट्रपती (New President Of India) मिळणार आहेत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सहाजिकच आता देशाच्या सर्वोच्च पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नव्या राष्ट्रपतींसाठी सध्या पाच नावं ही चर्चेत आहे. ही पाचही चर्चेतली नावं ही महिलांची (Women President Of India) आहेत. त्यामुळे देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना बहुमान मिळाला होता. आता असाच बहुमान दुसऱ्या महिलेला मिळणार का? हेही पाहणं तितकेच म्हत्वाचं आहे. मात्र आता भाजप कुणाच्या नावासाठी पुढकार घेतं? त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. येत्या काही दिवसांतच हेही चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीची तयारी आता निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

चर्चेतली पाच नावं कोणती?

  1. यात पहिलं नाव आघाडीवर आहे ते माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं, मराठमोळ्या सुमित्रा महाजन यांचा जन्म कोकणातील आहे. इंदोरच्या जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर मध्य प्रदेश हेच त्यांचं कार्यक्षेत्रं बनलं. सुमित्रा महाजन या इंदौरमधून 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 रोजी सलग संसदेत निवडून गेल्या, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. आता महाजन या राष्ट्रपती झाल्यास प्रतिभा पाटील यांच्या नंतरच्या त्या दुसऱ्या मराठी राष्ट्रपती ठरू शकतात.
  2. राष्ट्रपतीपदाच्या यादीत सध्या दुसरं नाव चर्ते आहे ते उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं, आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत, तसेच त्या गुजरातच्याही असल्याने त्यांच्या नावाचा मोदी विचार करू शकतात अशा चर्चा आहेत.
  3. राष्ट्रपतीपदासाठी तिसरं नाव चर्ते आहेत ते छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके याचंं, कारण राष्ट्रीय राजकारणात अनुसया उईके यांचाही मोठा राजकीय दबदबा आहे. तसेच आदिवासी महिला म्हणूनही त्यांना हा बहुमान दिला जाऊ शकतो.
  4. राष्ट्रपतीपदासाठी चौथं नाव चर्तेत आहे ते तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांचं, यांची मोठी राजकीय कारकिर्द पाहता त्यांच्याही वर्णी राष्ट्रपतीपदी लागू शकते.
  5. पाचवं नाव या पदासाठी चर्चेत आहे ते झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांचं, देशात आजपर्यंत आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदापर्यंत कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी ही दोन्ही नावं आघाडीवर आहे.

कधी निवडणूक, कधी निकाल?

आज निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहेत. त्यानुसार…

  1. 15 जून अधिसूचना जारी होणार आहे.
  2. 29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असणार आहे.
  3. तसेच 2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
  4. तर 18 जुलै, मतदान होणार आहे.
  5. 21 जुलै, निकाल लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.