AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | पंतप्रधान मोदी यांचे ‘कान आणि डोळे’, 3 वर्षात 54 वेळा अयोध्येला गेले, राम मंदिराच्या उभारणीसाठी…

गेली तीन वर्ष राम मंदिर बांधकामाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. हे मंदिर वेळेत उरण व्हावे यासाठी एका व्यक्तीने मोलाचे योगदान दिले आहे. 3 वर्षात सुमारे 54 ते अयोध्येला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'डोळे आणि कान' म्हणून त्यांची ओळख आहे.

Ram Mandir | पंतप्रधान मोदी यांचे 'कान आणि डोळे', 3 वर्षात 54 वेळा अयोध्येला गेले, राम मंदिराच्या उभारणीसाठी...
RAM MANDIR AND PM NARENDRA MODIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 20, 2024 | 4:51 PM
Share

नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. नगारा शैलीत बांधलेल्या भव्य मंदिराच्या गर्भगृहात भगवान राम विराजमान होणार आहेत. गेली तीन वर्ष राम मंदिराचे बांधकाम अहोरात्र सुरू आहे. मंदिराचे बांधकाम वेळेत व्हावे यासाठी एका व्यक्तीचे मोठे योगदान आहे. 3 वर्षात 54 वेळा त्यांनी अयोध्येला भेट दिली. अयोध्या हे जणू काही त्यांचे दुसरे घर बनले. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान असेही त्या व्यक्तीला नाव पडले. ती व्यक्ती म्हणजे राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्रा.

कोण आहेत नृपेंद्र मिश्रा ?

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे 8 मार्च 1945 रोजी जन्मलेल्या नृपेंद्र मिश्रा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या विभागाचे ते टॉपर होते. जेव्हा त्याने PG चा अभ्यास पूर्ण केला. मात्र, त्यावेळी ते सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसण्यास पात्र ठरले नाहीत. 2 वर्षे बाकी होती त्यामुळे त्यांनी दुसरी पदव्युत्तर पदवी घेण्याचे ठरवले. अलाहाबाद विद्यापीठातच नृपेंद्र मिश्रा यांनी एमए राज्यशास्त्राला प्रवेश घेतला. नंतर, नागरी सेवेत रुजू झाल्यानंतर 1980 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली.

नृपेंद्र मिश्रा यांची नागरी सेवेत निवड झाली आणि ते IAS झाले. त्यांना उत्तर प्रदेश केडर देण्यात आले. त्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर आले आणि वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव झाले. निर्यात युनिटशी संबंधित सर्व प्रस्तावांवर ते काही मिनिटांतच निर्णय घेत असत. मिश्रा यांच्यासोबत काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अतिशय तीक्ष्ण आहे.

त्या लेखाने भाजपचे लक्ष वेधले

नृपेंद्र मिश्रा हे खत सचिव आणि दूरसंचार सचिव होते. 2006 मध्ये त्यांची दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2009 नंतर त्यांनी ‘पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन’ सुरू केले ज्याला त्यांनी ‘वन मॅन एनजीओ’ म्हटले. देशातील लोकशाही परंपरा अधिक दृढ करणे हा त्याचा उद्देश होता. याच काळात मिश्रा यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिण्यास सुरुवात केली. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांचा एक लेख विशेष प्रसिद्ध झाला होता. ज्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत बचाव केला होता. या लेखातूनच ते भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले होते.

मोदी यांची ब्लू प्रिंट तयार केली.

2014 ची लोकसभा होती. भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले. एके दिवशी कार चालवत होते. त्यावेळी दुपारी त्यांना अरुण जेटली यांचा फोन आला. त्यांनी मिश्रा यांना गुजरात भवन येथे बोलावले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तिथे मुक्कामी होते. ते जेटलींना भेटायला गेले त्यावेळी अजित डोवाल आणि काही लोक तिथे उपस्थित होते. येथे त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच भेटीत नृपेंद्र मिश्रा यांच्यावर मोदी यांची ब्लू प्रिंट तयार करण्याचे काम सोपविले.

पंतप्रधान कार्यालयात प्रवेश

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी नृपेंद्र मिश्रा यांना त्यांचे प्रधान सचिव बनवण्याचा प्रस्ताव दिला. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्याच दिवशी 27 मे रोजी मिश्रा यांनी पदभार स्वीकारला. यानंतर नृपेंद्र मिश्रा पुढील ५ वर्षे पीएमओमध्ये पंतप्रधानांचे ‘डोळे आणि कान’ राहिले. पंतप्रधानांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक योजना आणि हेतूच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आपले आयुष्य दिले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.