Narendra Modi : 2022 मधला मोदींचा पहिलाच विदेश दौरा! रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आजपासून युरोपवारी

Narendra Modi Europe Tour : रशिया आणि युक्रेन यांच्या ताणलेल्या संबंधांवरुन युरोप दौऱ्यादरम्यान होणाऱ्या भेटीगाठी आणि बैठकांमध्ये या तिन्ही देशातील नेत्यांसोबत काय चर्चा होते, याकडेही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे.

Narendra Modi : 2022 मधला मोदींचा पहिलाच विदेश दौरा! रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आजपासून युरोपवारी
नरेंद्र मोदी, पंतप्रधानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 6:23 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 2022 मधील पहिल्या विदेश दौऱ्याला (Europe visit) आजपासून सुरुवात होणार आहे. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्स (Germany, Denmark, and France) या तीन देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील. रविवारी रात्री नरेंद्र मोदी या दौऱ्यासाठी रवाना झाले. जर्मनीपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्याचा शेवट फ्रान्समध्ये होणार आहे. विशेष म्हणजे एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. रशिया युक्रेन यांच्या युद्धातच होत असलेल्या मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या दौऱ्या दरम्यान, द्वीपक्षीय चर्चेसोबत आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याच प्रमाणे रशिया आणि युक्रेन यांच्या ताणलेल्या संबंधांवरुनही दौऱ्यादरम्यान होणाऱ्या भेटीगाठी आणि बैठकांमध्ये या तिन्ही देशातील नेत्यांसोबत काय चर्चा होते, याकडेही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे.

असा असेल मोदींचा दौरा

जर्मनीपासून मोदींच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याला सुरुवात होईल. यावेळी जर्मनीच्या चॅन्सलसलोबत मोदींची द्वीपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित असणार आहेत. भारत आणि जर्मनी इंटर गर्व्हन्मेंटल कन्सल्टेशनच्या सहाव्या फेरीची ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जातेय.

डेन्मार्क व्हाया जर्मनी

जर्मनीनंतर मोदी डेन्मार्कमध्ये जातील. डेनमार्कमध्ये भारत आणि नॉर्दिक कराराची दुसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत करारासंबंधी वेगवेगळ्या पैलूंच्या अनुशंगानं चर्चा होणार आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मोदींनी कोपेनहेगनला येण्याची निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मोदींचा डेन्मार्कचा दौराही महत्त्वाचा मानला जातोय.

शेवटी फ्रान्स

दरम्यान, 4 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा असेल. भारत आणि फ्रान यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान, भविष्यातील राजकीय संबंधांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या रणनितीवर चर्चा होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी मॅक्रॉन नुकतेच निवडून आले होते. दुसऱ्यांना मॅक्रॉन निवडून आल्यानंतर मोदी त्यांचं यावेळी अभिनंदनही करतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.