पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता
येत्या 3 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती आखण्यासाठी आज (27 एप्रिल) सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत (PM Modi Video Conference with Chief Ministers Corona Lockdown Extension) आहे.
नवी दिल्ली : ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत (PM Modi Video Conference with Chief Ministers Corona Lockdown Extension) आहे. येत्या 3 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती आखण्यासाठी आज (27 एप्रिल) सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे.
या बैठकीला सकाळी 10.30 ला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या बैठकीत सहभागी झाले आहेत. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन काही कारणास्तव या बैठकीला गैरहजर असल्याचे पाहायला मिळत आहे.
या बैठकीमध्ये आतापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी आपपल्या राज्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहे, कोरोनामुळे किती मृत्यू झाले याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर आता या बैठकीत लॉकडाऊन वाढण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जात आहे. दरम्यान या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे.
Prime Minister Narendra Modi holds video conference with the Chief Ministers of all States on COVID19 situation. pic.twitter.com/D9kiiXk4XK
— ANI (@ANI) April 27, 2020
पंतप्रधान मोदींची दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांनी 11 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह धरला होता. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणाही केली.
कोरोनाच्या संदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांसह 20 मार्चला झालेल्या पहिल्या बैठकीनंतर 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.
मन की बातमधून जनतेशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (26 एप्रिल) सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री आहे. देशात महायज्ञ सुरु (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) असल्याची स्थिती दिसत आहे. प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे. भारतासारखा मोठा देश कोरोनाविरुद्ध निर्णायक लढाई लढत आहे. देशातील सर्व नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज पूर्ण देश एकाच लक्ष्यावर चालला आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“देशातील कोणीही नागरिक उपाशी राहता कामा नये. तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं आहे तर कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक नगारिक या लढाईला ‘पीपल ड्रिव्हन’ बनवत आहे,” असेही मोदी (PM Modi Video Conference with Chief Ministers Corona Lockdown Extension) म्हणाले.
संबंधित बातम्या :
मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान