ज्या ED ला रात्रंदिवस शिव्या दिल्या जातात, त्याने 22 हजार कोटी वसूल केले…WITT मधून नरेंद्र मोदींच्या विरोधकांना कानपिचक्या
बँकींग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असाच बदल झाला. ५०-६० वर्षापूर्वी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पण गावात बँकांची सुविधाच नव्हती. आम्ही प्रत्येक घरात ऑनलाईन बँकींग सुविधा दिली. देशात प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंगचा टच पॉइंट आहे. बँकिंग सिस्टीम मजबूत केली.

टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today) ला शुक्रवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. देशाचा विकासाची गाथा सांगत विरोधकांना घेरले. गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेची असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कामगिरीची यशोगाथा मोदी यांनी मांडली. ज्या ईडीला रात्रंदिवस शिव्या दिल्या जातात, त्या ईडीने २२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. हा पैसा कायदेशीर मार्गाने पीडितांना परत दिल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी
देशातील काही वर्षांपूर्वीची परिस्थिती सांगताना नरेंद्र मोदी म्हणाले, २०१३ पूर्वी महिलांना पाणी आणण्यासाठी तलवापर्यंत जावे लागत होते. आज हर घर जलद्वारे त्यांना पाणी घरात मिळत आहे. केवळ दशक बदलले नाही तर लोकांचे आयुष्य बदलले आहे. त्यामुळे आता जगही भारताच्या विकासाचे मॉडेल स्वीकारत आहे. आज नेशन ऑफ ड्रीम नाही, नेशन ऑफ डिलिव्हर झाला आहे. जेव्हा एखादा देश नागरिकांच्या सुविधांना महत्त्व देतो, तेव्हा देशाचे नशीब बदलते, असे मोदी यांनी सांगितले.
पासपोर्ट बनवणे किती सुलभ झाले…
पूर्वी पासपोर्ट बनवणे अधिक कठिण होते, त्याची आठवण सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी राज्याच्या राजधानीतच पासपोर्ट केंद्र होते. छोट्या शहरातील लोकांना पासपोर्ट बनवायचे असेल तर शहरात एक, दोन दिवस राहावे लागत होते. देशात केवळ ७७ पासपोर्ट सेवा केंद्र होते. आता ५५० जास्त पेक्षा पासपोर्ट केंद्र झाली आहेत. पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी वेटिंग टाईम ५० दिवस होता. आता तो पाच सहा दिवसांवर आला आहे.




बँकींग प्रणालीतील बदल सांगताना नरेंद्र मोदी म्हणाले, बँकींग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असाच बदल झाला. ५०-६० वर्षापूर्वी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पण गावात बँकांची सुविधाच नव्हती. आम्ही प्रत्येक घरात ऑनलाईन बँकींग सुविधा दिली. देशात प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंगचा टच पॉइंट आहे. बँकिंग सिस्टीम मजबूत केली. बँकेचा एनपीए कमी झाला आहे. बँकांचा नफा एक लाख कोटीच्यावर गेला आहे. ज्यांनी बँकांना लुटले, त्यांनाही पैसे द्यावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले.
अंमलबजावणी संचालनाल्यच्या कामगिरीचे कौतूक करताना नरेंद्र मोदी म्हणाले, ईडीला शिव्या दिल्या जात आहेत. त्या ईडीने २२ हजार कोटी वसूल केले आहेत. हा पैसा कायदेशीर मार्गाने पीडितांना परत केला आहे. ज्यांच्याकडून पैसा लुटला त्यांना परत दिला जात आहे. एफिशियन्सीने सरकार इफेक्टिव्ह होत आहे. कमी वेळात अधिक काम झाली पाहिजे. वायफळ खर्च नसावा. रेड कार्पेट नसावा. जेव्हा सरकार हे करते तेव्हा ते सरकार देशातील संसाधनांचा रिस्पेक्ट करत आहे हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.
असा वाचवला खर्च
पूर्वी सरकारमध्ये जास्तीत जास्त लोकांना मंत्रालय देण्याचा प्रयत्न केला जात होते. पण आमच्या सरकारने पहिल्याच कार्यकाळात मंत्रालयांचे विलीकरण केले. वेगवेगळी मंत्रालये एकत्र केली. जलसंसधान आणि पेयजल वेगवेगळ होते. ते एकत्र करून जलशक्ती मंत्रालय केले, त्यामुळे खर्च वाचला. आम्ही राजकीय मजबुरी शिवाय देशाचे रिसोर्सेस महत्त्वाचे मानले. १५०० कायदे संपवले. ४० हजार कंप्लायन्सीस हटवले. त्यामुळे जनतेची काम सुलभ झाली. सरकारी मशिनरीची एनर्जी वाचली. जीएसटीतून ३० करांचा मिळून एक टॅक्स केला. त्यामुळे बराच फरक पडला. भ्रष्टाचार थांबवला. टेंडर प्रक्रिया सुलभ केली. त्यामुळे सरकारला एक लाख कोटींचा फायदा झाला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.