पंबन-चनाब पुलापासून ते अटल सेतूपर्यंत… पंतप्रधान नरेंद्र मोदी काय-काय म्हणाले?
विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, तामिळनाडूचा विकास जितका जास्त होईल तितका देशाचा विकास होईल. मोदी सरकारने आधीच्या रकमेच्या तिप्पट रक्कम दिली आहे. या वाढीसाठी खूप मदत झाली आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावरुन परताच दक्षिण भारतात पोहचले. त्यांनी रामेश्वरममध्ये 8300 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यादरम्यान त्यांनी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज राम नवमी आहे. प्रभू रामाची प्रेरणा राष्ट्रनिर्मितीचा आधार आहे. आजच आयोध्येत राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीला सूर्य टिळा करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला आनंद आहे की आज 8300 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केले आहे. तामीळनाडू ही भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांची भूमी आहे. येथील पांबन पूल हे तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. एकविसाव्या शतकातील अभियांत्रिकीचे हे उत्तम उदाहरण आहे. पंबन पुलामुळे प्रवास सुकर होणार आहे. हा पूल तंत्रज्ञान आणि वारसा यांचा मिलाफ आहे.
पंतप्रधान म्हणाले, भारतातील हा पहिला उभा सागरी पूल आहे. या पुलामुळे रेल्वेगाड्या पूर्वीपेक्षा अधिक वेगाने धावतील. या पुलाच्या निर्मितीची अनेक दिवसांपासून मागणी होती. ती आता पूर्ण झाली आहे. हा पूल परिसरातील व्यापार, उद्योगांनाही चालना देणारा ठरणार आहे. नवीन रेल्वे सेवेमुळे रामेश्वरम ते चेन्नई आणि देशाच्या इतर भागांमध्ये पर्यटन आणि व्यापार वाढेल. गेल्या दहा वर्षांत भारताचा विकास दर दुप्पट झाला आहे.
#WATCH | Rameswaram, Tamil Nadu: PM Narendra Modi says "I feel blessed that I could pray at the Ramanathaswamy temple today. On this special day, I got the opportunity to hand over development works worth Rs 8,300 crores. These rail and road projects will boost connectivity in… pic.twitter.com/Zkp7FOir31
— ANI (@ANI) April 6, 2025
विकासाचा आढावा घेत नरेंद्र मोदी म्हणाले, रेल्वे, रोड, विमानतळ आणि गॅस पाइपलाइनच्या बजेटमध्ये जवळपास 6 पट वाढ करण्यात आली आहे. आज देशात मेगा प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. जगातील सर्वात उंच चिनाब पूल नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये बांधण्यात आला आहे. उत्तरेला बोगी पूल आणि मुंबईत अटल सेतू बांधण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरही तयार केला जात आहे. मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरु आहे.
विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, तामिळनाडूचा विकास जितका जास्त होईल तितका देशाचा विकास होईल. मोदी सरकारने आधीच्या रकमेच्या तिप्पट रक्कम दिली आहे. या वाढीसाठी खूप मदत झाली आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना भारत सरकारचे प्राधान्य आहे. येथील रेल्वे बजेट 7 पटीने वाढले आहे. परंतु काही लोकांना विनाकारण रडण्याची सवय असते आणि ते रडतच राहतात. 2014 पूर्वी रेल्वेसाठी 900 कोटी रुपये उपलब्ध होते. या सरकारने 6000 कोटी रुपयांहून अधिक दिले. सरकार 77 रेल्वे सत्र मॉडेल स्टेशन बनवत आहे, ज्यामध्ये रामेश्वरम स्टेशन देखील समाविष्ट आहे.