जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल…राज्यसभेतील गोंधळात नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी, रोख कुणावर ?

नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्याकडे माती आहे पण माझ्याकडे गुलाल आहे. त्यामुळे मी गुलाल उधळला आहे. विरोधकांच्या गोंधळावर आणि घोषणाबाजीवर नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे.

जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल...राज्यसभेतील गोंधळात नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी, रोख कुणावर ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 3:17 PM

नवी दिल्ली : जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलणार हे खरं आहे. काही लोकांनी कमळ उमलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी गदारोळ सुरू केला होता. नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी मोदी-अडाणी भाई-भाई अशा घोषणा देत अडाणीच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना त्यांनी मोठं भाषण केलं यामध्ये राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली आहे. राहुल यांच्या भाषणातील निवडक बाबींवरच भाष्य केले होते.

त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडाणी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कुठेलेही भाष्य न केल्यानं आजच्या राज्यसभेत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेत भाषण करत असतांना विरोधी बाकावर असलेल्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच गदारोळ सुरू केला. यावेळी मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा देत मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, नरेंद्र मोदी यांनी गदारोळ सुरू असतांनाही आपले भाषण सुरूच ठेवत टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या सभागृहातील भाषणावर देशातील प्रत्येकाचे लक्ष असते. त्यामुळे निराशा होत आहे हे दुर्दैवी असल्याचं मोदी म्हणाले आहे.

याशिवाय विरोधकांच्या गोंधळावर आणि घोषणाबाजीवर नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्याकडे माती आहे पण माझ्याकडे गुलाल आहे. त्यामुळे मी गुलाल उधळला आहे.

जितका चिखल तुम्ही टाकत जाल तितके कमळ उमलत जाईल. आणि तेच कमळ उमलविण्यात तुमची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.

यावेळी भाषणात नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं की आम्ही संकटापासून पळून जाणारे लोक नाही. कधीकाळी ज्यांची ग्रामपंचायत पासून संसदेपर्यन्त सत्ता होती त्यांनी देशासाठी काहीही काम केले नाही.

आज आमच्या सरकारने जगभरात ओळख केली आहे. ती देखील आमच्या कष्टाने केली आहे. असा टोला नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आम्ही कुठलीही समस्या कायम स्वरूपी सोडवत असतो असं मोदी म्हणाले आहे.

देशातील पाण्याच्या बाबतीत विचार केला जात प्रत्येक घरातील नळ कनेक्शनवर बोललो तर करोडो लोकांना मदत केली आहे. यापूर्वी पाण्याचे टाकीचे उद्घाटन केले आहे. यापूर्वी 3 कोटी घरांना नळ दिले होते आम्ही ते 11 कोटींवर नेले आहे असेही नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे.

अनेक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. मात्र अर्ध्याहून अधिक लोकांचे बँकेत खाते नव्हते, आम्ही जनधन योजेनच्या माध्यमातून गरीब नागरिकांना बँकेशी जोडले असून 48 खातेधारक आम्ही बँकेशी जोडले असल्याचे मोदी म्हणाले आहे.

यापूर्वी देशात योजना प्रलंबित ठेवण्याचे काम केलं जायचं. मात्र पीएम गती शक्तीच्या माध्यमातून योजना वेगाने पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. गरीबी हटवा असे तुम्ही म्हणायचे पण जनता काम पाहते आहे अशीही टीका मोदींनी कॉंग्रेसवर केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.