मोठी बातमी! मोदींच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा चकमकीत ठार

पोलीस चकमकीत ठार झालेल्या दिल्ली पोलीस कमांडोच्या हत्याराचं नाव जावेद असं असल्याचं सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी! मोदींच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा चकमकीत ठार
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 7:51 AM

नवी दिल्ली : पीएम सिक्युरिटीमध्ये (PM Security) तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ब्लॅक कॅट कमांडोच्या (Commando) हत्या प्रकरणात दिल्ली आणि यूपी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, पोलिसांकडून मारेकऱ्याला शरण जाण्याचा इशारा देण्यात आला होता, पण त्याने उलट पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या तुफान गोळीबारात मारेकरी गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (prime minister security black commando murderer Died in police encounter)

पोलीस चकमकीत ठार झालेल्या दिल्ली पोलीस कमांडोच्या हत्याराचं नाव जावेद असं असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत जावेद ठार झाल्याची अधिकृत माहिती दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या डीसीपी प्रमोद कुमार सिंह कुशवाहा यांनी दिली आहे. डीसीपी कुशवाहा यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी उत्तर प्रदेशच्या ठाना क्षेत्रात चकमकीत झाली. यामध्ये पीएम सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोचा मोरेकरी जावेद याची हत्या झाली आहे.

कोण असता ब्लॅक कॅट कमांडो?

देशाचे सगळ्यात खतरनाक कमांडो म्हणजे ब्लॅक कॅट कमांडो. यांना एनएसजी कमांडो असंही म्हणतात. देशात वारंवार होत असलेल्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी 16 ऑक्टोबर 1984 रोजी एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. एनएसजीचा मूळ मंत्र म्हणजे ‘सर्वत्र उत्तम संरक्षण’. कमांडोज एनएसजीला ‘नेव्हर से गिव्हअप’ असंही म्हणतात. खरंतर, ब्लॅक कॅट कमांडो होणं सोपं काम नाही.

काळ्या वर्दी आणि मांजरीसारख्या चपळामुळे त्यांना ब्लॅक कॅट असं म्हणतात. ब्लॅक कॅट कमांडो होण्यासाठी सैन्य, पॅरा मिलिटरी किंवा पोलिसात असणं आवश्यक आहे. सैन्यातून 3 वर्षे आणि पॅरा मिलिटरीकडून 5 वर्षे कमांडो प्रशिक्षणासाठी येत असतात.

यासाठी फिजिकल ट्रेनिंग, पॉलिमीट्रिक जम्प, झिग झॅग रन, सिट अप्स, लॉग एक्सरसाइज, 60 मीटरची स्प्रिंग रन, 100 मीटरची स्प्रिंग रन, मंकी क्रॉल, इनक्लाइंड पुश अप्स, शटल रन, बॅटल असॉल्ट ऑब्स्टेकल कोर्स, डब्ल्यू वॉल, टारजन स्विंग, कमांडो हँडवॉक, टायगर जंप अशा अनेक प्रकारच्या परीक्षा द्यावा लागतात.

मोदींची सुरक्षा

दरम्यान, 2020 मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी दररोज एक कोटी 62 लाख रुपये खर्च केले जातात अशी माहिती देण्यात आली होती. जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधानांचं संरक्षणासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ची नेमणूक करण्यात आली आहे. इतकंच नाही त्यांच्या संरक्षणाखाली एक हजाराहून अधिक कमांडो विविध मंडळांतर्गत तैनात केले जातात. म्हणजेच, भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था जगातील कोणत्याही इतर देशाच्या राज्यप्रमुखांची सुरक्षा व्यवस्थे इतकी जोरदार आहे. (prime minister security black commando murderer Died in police encounter)

संबंधित बातम्या – 

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

‘कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही’, शेतकरी आंदोलनावर सुरु असलेल्या घमासानवर गृहमंत्र्यांचं मोठं विधान

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

(prime minister security black commando murderer Died in police encounter)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.