पंतप्रधानांनी आमच्याही मनातील खदखद ऐकावी..! ब्रिजभूषण सारखा देशात गुन्हेगार नसेल ; आंदोलनातील कुस्तीपटूंची भावना

ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी खेळाडूंच्या कृपेने नाही तर जनतेच्या बळावर खासदार झालो आहे, आणि एवढेच नाही तर भविष्यातही राहणार आहे.

पंतप्रधानांनी आमच्याही मनातील खदखद ऐकावी..! ब्रिजभूषण सारखा देशात गुन्हेगार नसेल ; आंदोलनातील कुस्तीपटूंची भावना
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 12:23 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप आठव्या दिवशीही सुरूच आहे. या निदर्शनादरम्यान पैलवानांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला न्याय देण्याची मागणी लावून धरली आहे. या निषेधार्थ बजरंग पुनिया म्हणाले, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले की, या चळवळीला आम्हाला मोठं रुप द्यायचे आहे. देशातील न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही पैलवानांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कौंटुबीक वादावर बोलतान सांगितले की, या क्षेत्रात सर्व परिवारवाद सुरू असून ते आमच्यावर आरोप करत आहेत. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही खेळाडूला गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही.

मात्र ब्रिजभूषण यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर विनेश फोगट म्हणाल्या की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेवर काही बोलणार नाही? अनेक राज्यांतील खेळाडू पाठिंबा देत आहेत.

याशिवाय पंतप्रधानांनी आमच्याही मनाची दखल घ्यावी, आमच्याही मनातील त्यांनी ऐकावे. कोट्यवधी लोक आम्हाला पाठिंबा देत असून तेच आमची ताकद आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आपलीच मन की बात करू नये तर आमच्यासारख्या खेळाडूंच्या मनातीलही काही गोष्टी त्यांनी ऐकाव्या, कारण देशातील अनेक खेळाडू आता या लढाईत उतरले असल्याचे सांगत त्यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला बजरंग पुनिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमचा लढा हा निवडणुकींसाठी नाही.

तर डब्लूएफआय अध्यक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, एवढं होऊनही ब्रिजभूषण अजूनही हसतमुखाने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला व्यासपीठ देऊ नये. तरीही या प्रकरणात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रिजभूषण यांच्यासारखा भारतात कुठे मोठा गुन्हेगार नसेल मात्र तरीही त्यांचा अजून फुले आणि हार घालून सत्कार होत आहे. हे गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन गुन्ह्यांची नोंद केली आहे.

तर महिला कुस्तीपटूंकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दोन एफआयआरमध्येही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पहिली एफआयआर अल्पवयीन व्यक्तीने केलेल्या आरोपांशी संबंधित आहे, त्यामध्ये बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी खेळाडूंच्या कृपेने नाही तर जनतेच्या बळावर खासदार झालो आहे, आणि एवढेच नाही तर भविष्यातही राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिलेल्या आश्वासनानुसार पैलवानांनी आपापल्या घरी जावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.