मोदीजी देशभक्त आणि राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा, प्रियांका गांधी कडाडल्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभक्त आणि राष्ट्रदोहीमधला फरक ओळखला नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. | Priyanka Gandhi
लखनऊ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभक्त आणि राष्ट्रदोहीमधला फरक ओळखला नाही. नरेंद्र मोदी चीन अमेरिका आणि पाकिस्तानला जाऊ शकतात पण गेल्या दोन महिन्यांपासून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्याला ते भेटू शकत नाही. यावरुनच कळतंय की त्यांनी देशभक्त आणि राष्ट्रदोहीमधला फरक ओळखला नाही, असा हल्लाबोल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केला. (Priyanka Gandhi Criticized narendra Modi)
मोदींच्या भाषणात गोरगरिबांच्या विकासाच्या गोष्टी मात्र प्रत्यक्षात त्यांच्याविरोधी काम
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील शेतकरी महापंचायतीला संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. जनतेने मोदींना दोन वेळा निवडून दिलं. लोकांनी 2014 पेक्षा 2019 ला अधिक जागा भाजपला दिल्या. का दिल्या तर लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. भाषणात सब का साथ सब का विकासाच्या गोष्टी मोदी करतात. पण प्रत्यक्षात काम करताना सामान्य लोकांच्या हिताविरोधात त्यांची पावलं असतात, असा घणाघात त्यांनी केला.
…मात्र मोदींनी स्वत:साठी 16 हजार कोटींचं विमान घेतलं
गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करतंय, असा उच्चार मोदी अनेक वेळा करतात. मग शेतकऱ्याच्या हिताचा नारा लगावणाऱ्या मोजींनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची थकबाकी अद्याप का दिली नाही. वर्ष 2017 पासून ऊसाचे दर वाढलेले नाहीत. शेतकऱ्यांची थकबाकी दिलेली नाही. शेतकऱ्यांना पै देखील न देणाऱ्या मोदींनी मात्र स्वत:साठी 16 हजार कोटींचं विमान घेतलं, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्याला नव्हे तर उद्योगपतींना
नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रोश करतोय. मोदी सरकारला कायदे मागे घेण्यासाठी विनंती करतोय. पण मोदींनी आंदोलनजीवी म्हणत त्यांचीच चेष्टा केली. मोदी सरकारच्या या नवीन कायद्याचा फायदा फक्त उद्योगपतींनाच होणार आहे, असा दावा प्रियांका यांनी केला.
(Priyanka Gandhi Criticized Narendra Modi)
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींकडून परंपरा कायम, अजमेर शरीफ दर्गाला पाठवली चादर
कोरोनाने गुजरातची चिंता वाढविली; चार शहरांमध्ये पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लागू