खेळाडूंचे आंदोलन पेटणार; कुस्तीपटूंचे स्मृती इराणी, निर्मला सीतारामन यांच्यासह 41 महिला खासदारांना पत्र

महिला खेळाडू आपल्या न्यायासाठी गेल्या 20 दिवसांपासून त्या जंतरमंतरवर संघर्ष करत आहेत. त्यांच्या विरोधातील असलेल्या शक्तीने प्रशासनाचा कणाच मोडला नसून शासनालाही बहिरे व आंधळे केले असल्याची भावना पैलवानांची आहे.

खेळाडूंचे आंदोलन पेटणार; कुस्तीपटूंचे स्मृती इराणी, निर्मला सीतारामन यांच्यासह 41 महिला खासदारांना पत्र
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 11:37 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतरमंतरवर अजूनही कुस्तीपटूंचा संप सुरूच असल्याने त्यावरून जोरदार हंगामा सुरु झाला आहे. त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्ती महासंघाच्या संपूर्ण मंडळाचे झालेले विसर्जन हा आपला पहिला विजय असल्याचे त्या कुस्तीपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आंदोलक बजरंग पुनिया यांनी सांगितले की, ते त्यांच्या सहकाऱ्यांना पत्र लिहित आहे की, धरणे धरून 22 दिवस उलटले तरी अजूनपर्यंत आंदोलनकर्त्यांपर्यंत कुणीच पोहचले नाही. त्यामुळे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणा ब्रिजभूषण शरण सिंह गुन्हेगार असल्याचे मी संपूर्ण देशासमोर सांगत असल्याचे साक्षी मलिकने म्हटले आहे. त्याचबरोबर या व्यवस्थेविरोधात उभा राहण्यासाठी सर्व महिलांनी जंतरमंतरवर यावे असं आवाहनही साक्षी मलिकने केले आहे.

याशिवाय लोकांनी आपापल्या घरी आणि जिल्हा मुख्यालयी जाऊन ब्रिजभूषण यांच्याविरोधता निवेदन देऊन या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहनही करण्यात आले आहे.

या आंदोलना प्रत्येकजण सहकार्य करत राहिल तेवढा मला एक मुलगी असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटेल अशा भावनाही या आंदोलनातून व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंदोलक कुस्तीपटूंनी भाजपच्या सर्व महिला खासदारांनाही आता पत्र लिहिले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या इतर 41 महिला नेत्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.

कुस्तीपटूंनी भाजपच्या महिला खासदारांना आपले जीवन आणि खेळ बाजूला ठेवून प्रतिष्ठेसाठी लढण्याचा निर्णय घेतल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

महिला खेळाडू आपल्या न्यायासाठी गेल्या 20 दिवसांपासून त्या जंतरमंतरवर संघर्ष करत आहेत. त्यांच्या विरोधातील असलेल्या शक्तीने प्रशासनाचा कणाच मोडला नसून शासनालाही बहिरे व आंधळे केले असल्याची भावना पैलवानांची आहे.

बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलनातून या अन्यायविरोधात आवाज उठवत आहेत. त्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.