Bhagwant Mann Cabinet : भगवंत मान यांच्या टीमचा उद्या शपथविधी सोहळा, 11 जणांना मंत्रिपदाची संधी
पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाबच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) समावेश असणाऱ्या नेत्यांना शपथ देतील.
नवी दिल्ली: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाबच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) समावेश असणाऱ्या नेत्यांना शपथ देतील. शपथविधी झाल्यानंतर दुपारी 12.30 मिनिटांनी कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि नवनिर्वाचित आमदारांना पंजाबच्या 16 व्या विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन देखील सुरु झालं आहे. प्रोटेम स्पीकर म्हणून इंदरबीर सिंह निज्जर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. आपच्या आमदारांमध्ये अनेक जण पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या जोडीला टीम इलेव्हन
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपचे भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात शपथ घेतली होती. आता त्यांच्या सोबत आता 11 आमदारांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे. आपच्या 92 आमदारांपैकी नेमक्या कोणत्या सदस्यांना मंत्रिपदाची संधी मिळणरा हे स्पष्ट झालेलं नाही.
मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेल्या पहिल्या बैठकीत मान काय म्हणाले?
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी पहिल्या बैठकीला संबोधित केलं. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाद्वारे भगवंत मान यांचा नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संबंध चागंले राहावेत असा प्रयत्न दिसतो. नवी दिल्लीत देखील आपची लोकप्रियता वाढण्याचं देखील एक कारण होतं.
भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन सुरु करणार
भगवंत मान यांनी 23 मार्चला शहीद दिवसाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे, असं म्हटलंय. त्या हेल्पलाईनमध्ये माझा देखील मोबाईल क्रमांक असेल, असं मान यांनी स्पष्ट केलंय.
इतर बातम्या :