Patiala Violence : शिवसेना नेता हरिश सिंगला ला न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी, हिंसा भडकावण्याचा आहे आरोप
हा हिंसाचार पतियाळामध्ये असणाऱ्या काली माता मंदिराबाहेर झाला होता. तेथे सिंगला यांच्या समुहाने आर्य समाज चौक येथे खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. त्यावेळी तेथे काही शिख समुहातील लोक जमले ज्यांनी तलवारी काढल्या
पतिया : पंजाबच्या (Punjab) पतियाळामध्ये बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना खलिस्तान विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामोर्चावेळी दोन गट आमनसामने आल्याने मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी मोठी दगडफेक (Stone Pelting) झाली होती. त्यात काही लोक जखमी झाले होते. तर दोन गटात हिंसेला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे पतियाळाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू केली होती. त्यादरम्यान पंजाब शिवसेनाचे माजी कार्यकारी प्रमुख हरीश सिंगला यांना शुक्रवारी संध्याकाळी एसपी (शहर) हरपाल सिंग आणि डीएसपी मोहित अग्रवाल यांनी अटक केली होती. त्यानंतर पतियाळा हिंसाचार प्रकरणी हरीश सिंगला (Harish Singh) याला न्यायालयाने दोन दिवसांसाठी पटियाला पोलिसांकडे दिले आहे. हरिश सिंगलावर बेकायदा मोर्चा काढणे आणि हिंसा भडकवणे असे आरोप लावण्यात आले आहेत.
तलवारी काढल्या
हा हिंसाचार पतियाळामध्ये असणाऱ्या काली माता मंदिराबाहेर झाला होता. तेथे सिंगला यांच्या समुहाने आर्य समाज चौक येथे खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. त्यावेळी तेथे काही शिख समुहातील लोक जमले ज्यांनी तलवारी काढल्या होत्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तर त्यावेळी शिख समुहानेही मोर्चा काढला होता. मात्र त्यांनाही परवानगी देण्यात आली नव्हती. तप पोलिांनी दिलेल्या माहितीवरून असे समोर येते की, हे दोन्ही गट मंदिराच्या समोर आले आणि एकमेकांवर दगफेक करू लागले. त्यानंतर लगेच मंदिर परिसर बंद करण्यात आला आणि पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
तर SFJ ने केली होती मागणी
पंजाबच्या पतियाळामध्ये हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले हरिश सिंगला यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले, शिख फॉर जस्टिसकडून 29 तारखेला खलिस्तान स्थपना दिवस करण्याची मागणी केली होती. त्याविरोधात आम्ही हा मोर्चा काढला होता. तर शिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत पन्नून यांनी 29 तारखेला खलिस्तान स्थपना दिवस जोरदार करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.
मुख्यमंत्री भगवंत मान यांचं आवाहन
पतियाळातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राकेश अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. तर मान पोलीस महासंचालकांच्या संपर्कात होते. त्यावेळी मान यांनी,‘पतियाळातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. मी डीजीपींसोबत चर्चा केली आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. आम्ही स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. राज्यात कुणालाही अशांतता निर्माण करु देणार नाही, असं म्हटलं होतं
अफवांवर विश्वास ठेवू नका
त्याचबरोबवर पोलीस महानिरीक्षकांनी, आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. आम्ही पटियाला शहरात प्लॅग मार्च करत आहोत. दरम्यान, हिंसाचारात किती लोक जखमी झाले याची पाहणी केली जात आहे. काही अफवांमुळे तणाव वाढला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले. पटियालाच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी शांतता राखण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं होतं.
Punjab | Court sends Shiv Sena’s Harish Singla to two-day Police custody of Patiala Police, in connection with the clash that broke out yesterday in Patiala. pic.twitter.com/ExPyaUnVPF
— ANI (@ANI) April 30, 2022