Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका

आम आदमी पार्टीचा एक फॅक्टर तर जबरदस्त चालला. पंजाबमध्ये त्यांनी 12 महिलांना तिकीट दिलं होतं, त्यातल्या तब्बल 11 महिला निवडूण आल्या आहेत. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल (Harshita kejriwal) यांचं पंजबच्या प्रचारातलं एक भाषण व्हायरल होतंय.

Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका
हर्षिता केजरीवाल यांचं गाजलेलं भाषणImage Credit source: youtube
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 3:47 PM

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालाने (Five State Election result2022) सर्वांच्या नजरा केजरीवाल यांच्यावर खिळल्या आहे. कारण जे देशातल्या इतर कोणत्याही पक्षाला जमलं नाही, ते केजरीवालांच्या (arvind kejrival) आम आदमी पार्टीने करून दाखवलं. आम आदमी पार्टीने पंजाब एकहाती जिकलं. त्यात आम आदमी पार्टीचा एक फॅक्टर तर जबरदस्त चालला. पंजाबमध्ये त्यांनी 12 महिलांना तिकीट दिलं होतं, त्यातल्या तब्बल 11 महिला निवडूण आल्या आहेत. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल (Harshita kejriwal) यांचं पंजबच्या प्रचारातलं एक भाषण व्हायरल होतंय. हे भाषण प्रत्येकाने ऐकावं असं आहे. हर्षिता केजरीवाल यांनी भाषणाची सुरूवात करतानाच, लोकांनी बरोबर म्हटलंय पंजाबच्या जोशपुढे सर्व फिकं आहे. मी आज माझे चुलते भगवंत मान यांच्यासाठी मत मागायला तुमच्यापुढे आली आहे अशी केली.

हर्षिता केजरीवाल यांचं गाजलेलं भाषण

त्यानंतर त्यांनी अतिशय मुद्देसूद भाष केलं, त्या म्हणाल्या मुलांसाठी कुणी विचार केला असेल तर ती फक्त आम आदमी पार्टी आहे. तुम्ही दिल्लीतल्या मुलांना विचारलं तर तेही सांगतील की त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळतंय. तेही सरकारी शाळेत. दिल्लीतल्या सरकारी शाळांचे रिझल्ट प्राईव्हेट शाळेपेक्षा चांगले येत आहेत. त्याची चर्चा जगभरात आहे. आज दिल्लीत प्रत्येक मुलाल शिक्षणाचा आणि पुढे जाण्याची संधी दिली जात आहे. मी शिकायला बाहेर जाऊ शकले असते, मात्र मी माझ्या वडिलांकडून एक गोष्ट नक्की शिकलीय. ती म्हणजे देशात रहायचं. देशात शिकायचे, देशासाठी काम करायचे. आणि देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. म्हणून इथेच रहायचा निर्णय घेतला. खूप लोक बोलत होते तू तर मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे. तुला काय गरज आहे नोकरी करायची? मात्र वडिलांकडून हेही शिकले की. ते इथे मुख्यमंत्री बनायला नाही आले. ते इथे समाजसेवा करण्यासाठी आले आहेत. ते इथे लोकांची मदत करायला आले आहेत. देशाला पुढे घेऊन जायला आले आहेत. ते त्याचे कर्तव्य करत आहेत. मला माझे कर्तव्य करायचे आहे. माझ्या पायवर उभे राहायचे आहे, असे म्हणत त्यांनी पंजाबच्या लोकांनी मनं जिकली.

पंजाबला काय आवाहन केलं?

पंजाबमध्येही प्रत्येक तरूण, तरूणीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. पंजबमधून आणखी कल्पना चावला आल्या पाहिजेत ज्या देशाचं नावं मोठं करतील. आम आदमी पार्टी निवडूण आल्यास प्रत्येक महिलेला एक हजार रुपये महिल्याला देण्याचे आश्वासन दिले आहे. ही छोटी रक्कम आहे. मात्र याने मदत मोठी होणार आहे. आज तुमची मुलगी तुम्हीला हेच सांगू इच्छिते की, माझ्या वडिलांनी आणि भगवंत मान यांनी पंजाबसाठी खूप विचार केला आहे पंजाबच्या प्रश्नांचा. सध्या रोजगारासाठी लोक पंजाब सोडून बाहेर जात आहे. आम्ही पंजाबच्या विकासासाठी काम करू. आम्हीला एक संधी द्या, आम्ही नाराज करणार नाही. दिल्लीतल्या लोकांनी एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही. पुन्हा संधी दिली. असे म्हणत त्यांनी तरुणाईला साद घातली. आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हा देशाने निकालानंतर पाहिला आहे.

आपच्या विजयी उमेदवार

  1.  अमृतसर पूर्व: आपच्या जीवनज्योत कौर यांनी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव केला.
  2. संगरूर: आपच्या नरिंदर कौर भाराज यांनी पंजाबचे मंत्री विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला.
  3. बालचौर : संतोष कुमारी कटारिया यांनी अकाली दलाच्या सुनीता राणी यांचा पराभव केला.
  4. जारगाव : सर्वजित कौर मनुके यांनी अकाली दलाच्या एसआर कालेर यांचा पराभव केला.
  5. तळवंडी साबो : प्रा. बलजिंदर कौर यांनी अकाली दलाच्या जीत मोहिंदर सिंग सिद्धू यांचा मतांनी पराभव केला.
  6. खरर : गायक अनमोल गगन मान यांनी अकाली दलाच्या रणजित सिंग गिल यांचा पराभव केला.
  7. लुधियाना दक्षिणः राजिंदर पाल कौर यांनी भाजपच्या सतींदरपाल सिंह ताजपुरी यांचा पराभव केला.
  8. अमनदीप कौर अरोरा यांनी सोनू सूदची बहीण मालविका सूद यांचा पराभव केला.
  9. बलजीत कौर यांनी अकाली दलाचे उमेदवार हरप्रीत सिंग यांचा पराभव केला.
  10. नकोदर : इंद्रजीत कौर मान यांनी अकाली दलाच्या जी. प्रताप वडाळा यांना पराभूत केले.
  11. राजपुरा: नीना मित्तल यांनी भाजपच्या जगदीश कौर जग्गा यांचा पराभव केला.

धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक

Nagpur | कौटुंबिक समुपदेशन का गरजेचे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी सांगितले कारण

कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावरय प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.