पंजाबनेही लॉकडाऊन 1 मेपर्यंत वाढवला, महाराष्ट्र, कर्नाटक ते दिल्ली, कोणत्या राज्याचं काय मत?
दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेणार आहेत. देशभरातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा, याचा फैसला उद्या होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याची भूमिका यामध्ये महत्वाची असेल. पंजाबने राज्यातील लॉकडाऊन आणि संचारबंदी 1 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)
14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून उमटला आहे. ओदिशाने आधीच 30 एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. कर्नाटकही महिनाअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहे. मात्र अंतिम निर्णय पंतप्रधानसोबत चर्चा करुन घेणार आहे. दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनाही लॉकडाऊनची मुदत वाढवून हवी आहे, तर राजस्थान टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मताचं आहे.
देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे 14 तारखेनंतरही लॉकडाऊन हवा, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. कोरोनाचा जिथून फैलाव झाला, त्या चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनचा दाखला कालच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
Punjab extends lockdown/curfew in the state till May 1st pic.twitter.com/mCjw01uy4D
— ANI (@ANI) April 10, 2020
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
दरम्यान, रेल्वे सुरु करायची की नाही, याचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेसेवा सुरु होण्याबद्दलचे मीडियातले सगळे रिपोर्ट रेल्वे मंत्रालयाने फेटाळले आहेत.
लॉकडाऊनबद्दल राज्ये काय म्हणतात ?
ओदिशा – 30 एप्रिलपर्यंत वाढ पंजाब – 1 मेपर्यंत वाढ कर्नाटक – 30 एप्रिलपर्यंत वाढवा महाराष्ट्र – लॉकडाऊन वाढवा मध्य प्रदेश – लॉकडाऊन वाढवा दिल्ली – लॉकडाऊन वाढवा तेलंगणा – लॉकडाऊन वाढवा हरियाणा – लॉकडाऊन वाढवा केरळ – लॉकडाऊन वाढवा राजस्थान – टप्प्याटप्प्याने हटवावा
(Punjab extends lockdown View of Maharashtra on extension)