ताजमहाल, ज्ञानवापीनंतर आता कुतुब मिनारही वादात, सूर्याच्या अध्ययनासाठी विक्रमादित्याने बांधला होता मिनार, पुरतत्व विभागाच्या माजी अधिकाऱ्याचा दावा
सूर्याच्या स्थितीचे अध्ययन करण्यासाठी सम्राट विक्रमादित्याने हा मिनार उभा केला होता, असा दावा या पुरातत्व विभागाच्या माजी अधिकाऱ्याने केलेला आहे.
नवी दिल्ली – ताजमहाल, ज्ञानवापी मशीद यानंतर आता या वादात आणखी एका वास्तूची भर पडली आहे. ती वास्तू आहे दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार. कुतुबमिनारबाबत पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माजी अधिकाऱ्याने मोठे विधान केले आहे. यामुळे आता कुतुबमिनारचा समावेशही वादग्रस्त वास्तूंमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या माजी अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार, कुतुबमिनारची निर्मिती पाचव्या शताब्दीत सम्राट विक्रमादित्याने केली होती. सूर्याच्या स्थितीचे अध्ययन करण्यासाठी सम्राट विक्रमादित्याने हा मिनार उभा केला होता, असा दावा या पुरातत्व विभागाच्या माजी अधिकाऱ्याने केलेला आहे. मुगल साम्राज्यातील मोठमोठ्या वास्तू, मिशिदी या आधी हिंदू धर्मियांची प्रार्थनास्थळे वा महत्त्वाच्या वास्तू होत्या, असा दावा सातत्याने करण्यात येतो आहे. ताजमहाल हा तेजोमहल असल्याचा दावाही करण्यात येतोय. ताजमहालातील बंद २० खोल्या उघडाव्यात यासाठी कोर्टांत याचिका करण्यात येत आहेत. ज्ञानवापी मशिदीतही नुकतेच सर्वे करण्यात आले आहे. त्यात या नव्या दाव्याने कतुबमिनारही पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
माजी आयएएस अधिकाऱ्याचे तीन मोठे दावे
१. कुतुबमिनार नव्हे सूर्यमिनार
पूरातत्व सर्वेक्षण विभागातील माजी विभागीय संचालक धर्मवीर शर्मा यांनी दावा केला आहे की, कुतुबमिनारची निर्मिती ही कुतुब उद दीन ऐबक याने केलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. हा कुतुबमिनार नसून सूर्यमिनार असल्याचा त्यांचा दावा आहे. याबाबतचे अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शर्मा यांनी अनेकदा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत या वास्तूचे सर्वेक्षण केलेले आहे.
२. कुतुब मिनार २५ इंच तिरका
शर्मांनी सांगितले आहे की, कुतुबमिनार २५ इंच तिरका आहे. कारण या ठिकाणाहून सूर्याचे अध्ययन करण्यात येत होते. त्यामुळे २१ जूनला जेव्हा सूर्य आकाशातील आपली जागा बदलतो, तेव्हा कुतुब मिनारच्या जागी अर्धा तास त्याची सावली खाली पडत नाही. हे एक विज्ञान आहे आणि पुरातात्विक साक्षही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
३. रात्री ध्रुव तारा बघण्यात येत असे
कुतुब मिनार ही एक स्वतंत्र इमारत आहे आणि जवळ असलेल्या मशिदीशी तिचा संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कुतुबमिनारचे दरवाजे उत्तरकडे आहेत. कारण रात्रीच्या वेळी ध्रुव तारा बघता यावा यासाठी हा मिनार बांधण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Delhi | Qutab Minar was actually ‘Vishnu Stambh’. Qutub Minar was built with materials obtained after demolishing 27 Hindu-Jain temples. The superimposed structure was built just to tease the Hindu community: VHP Spokesman Vinod Bansal pic.twitter.com/Zx5UKLPe7s
— ANI (@ANI) April 10, 2022
कुतुबमिनारचे नाव बदलण्याची हिंदू संघटनांची मागणी
गेल्या आठवड्यात कुतुबमिनारच्या परिसरात हिंदू संघटनांनी हनुमान चालिसाचे पठण केले होते. तसेच कुतुबमिनारचे नवाव बदलून त्याचे नाव विष्णूस्तंभ करावे अशीही मागणी करण्यात आली होती. जैन आणि हिंदू मंदिरांना तोडून कुतुब मिनार बांधण्यात केला होता, असा दावा युनायडेट हिंदू फ्रंटने केला आहे. पोलिसांनी या संघटनेतील काही जमांना ताब्यातही घेतले होते.
वादातील कुतुबमिनारचा इतिहास
११९३ साली दिल्लीचा पहिला मुस्लीम शासक कुतब उल दीन एबकने कुतुबमिनारची निर्मिती केली होती. अखेरच्या हिंदू शासकाचा पराभव केल्यानंतर त्यांनी ७३ मीटर उंचीची ही वास्तू उभारली होती. मात्र त्यांच्या काळआत केवळ तळघरच होऊ शकले. त्यानंतर इल्तुतमश यांनी तीन मजले बांधले आणि त्यांच्यानंतर फिरोज शाह तुघलकने १३६८ साली राहिलेले दोन मजले बाँधले असे सांगण्यात येते. पहिले तीन मजले लाल दगडांनी तर चौथा आणि पाचवा मजला मार्बलने तयार केलेली आहे. या मिनाराच्या खाली कुव्वत उल इस्लाम मशीद आहे. ती भारतातील पहिली मशीद असल्याचा दावा करण्यात येतो. मशिदीच्या समोर ५ मीटर उंचीचा लोखँडाचा स्तंभ आहे. हा शुद्ध लोखंडाचा असला तरी आजपर्यंत तो गजंलेला नाही. या लोह स्तंभाची निर्मिती राजा चंद्रगुप्त विक्रमादित्याने केली असे मानण्यात येते.