Qutub Minar : कुतूब मिनारच्या ‘उलट्या गणपती’वर आता वाद, भाजप नेत्यानंतर आता नगरसेवकाचाही पुजेच्या परवानगीची मागणी
कुतुबमिनारच्या शेजारी असलेल्या योगमाया मंदिराच्या पुजार्यांनीही असा दावा केला आहे की, कुतुबमिनारमध्ये अनेक वर्षांपासून गणेशाची पूजा केली जात होती. राजा पृथ्वीराज चौहान यांनी येथे मंदिर बांधले होते, असा त्यांचा दावा आहे.
नवी दिल्लीः कुतुबमिनारमध्ये (Qutub Minar) ठेवलेल्या गणेशमूर्तींवरून (Ganesh idol) वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. ही मूर्ती त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचा मागणी करण्यात येत होती. आता कुतुबमिनारमध्ये या मूर्ती योग्य ठिकाणी ठेवाव्यात व त्या ठिकाणीच पूजा-आरती करावी, अशी मागणी भाजपच्या (BJP) नगरसेवकाने केली आहे. ऐतिहासिक कुतुबमिनारमध्ये मंदिर असण्याचा आणि देवदेवतांच्या मूर्ती विकृत पद्धतीने ठेवण्याचा वाद अनेक वर्षापासूनचा आहे. पण आता स्थानिक नगरसेवक आरती सिंग यांनी दावा केला आहे की, 2000 सालापर्यंत कुतुबमिनारमधील प्राचीन मंदिरात लोक पूजा करण्यासाठी येत होते, मात्र ही प्रथा काही कारणांमुळे नंतर बंद करण्यात आली.
मेहरौली येथील भाजप नगरसेविका आरती सिंह यांनी दावा करुन सांगितला आहे की, कुतुबमिनार हे पूर्वी मंदिर होते. आणि आजही कुतुबमिनारमधील आतील बाजूला सर्वत्र देवदेवतांच्या मूर्तींचे अवशेष दिसतात. कुतुबमिनार येथील मशीद संकुलात देवाच्या मूर्ती जमिनीवर ठेवून त्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही आरती सिंग यांनी केला आहे.
पुरातत्वकडूनही पत्र
आरती सिंग यांच्या दाव्याआधीही बुधवारी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) असाच दावा केला होता. याबाबत NMA ने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) खात्याकडून त्या संदर्भात एक पत्रही देण्यात आले होते. कुतुबमिनारमध्ये श्रीगणेशाच्या मूर्त्यांची विटंबना करण्यात आल्या असून, त्या तिथून काढून राष्ट्रीय संग्रहालयात ठेवाव्यात, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
मशिदीच्या बाहेरील शिलालेखावरही उल्लेख
मुख्य दरवाजातून कुतुबमिनारमध्ये प्रवेश करताच कुव्वातुल इस्लाम मशिदीचा दरवाजा लागतो. कुव्वातुल इस्लाम याचा अर्थ आहे की, इस्लामची शक्ती. हिंदी चित्रपट फनासारख्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण त्याच्या आजूबाजूच्या परिसरात झाले आहे. मशिदीच्या बाहेरील शिलालेखावर हे स्पष्टपणे लिहिले आहे की हॉलवेच्या खांबांचे बांधकाम साहित्य 27 हिंदू आणि जैन लोकांच्या मंदिरांमधून घेण्यात आले होते. यावर पुरातत्व विभागाने येथे पुन्हा गणेशमूर्ती तयार करून येथे पारंपरिक पद्धतीने पूजा व आरती करण्याची मागणी नगरसेविका आरती सिंग यांनी केली आहे.
राजा पृथ्वीराज चौहान यांनी मंदिर बांधले
कुतुबमिनारच्या शेजारी असलेल्या योगमाया मंदिराच्या पुजार्यांनीही असा दावा केला आहे की, कुतुबमिनारमध्ये अनेक वर्षांपासून गणेशाची पूजा केली जात होती. राजा पृथ्वीराज चौहान यांनी येथे मंदिर बांधले होते, असा त्यांचा दावा आहे. याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजा केली जात होती, परंतु मुघल भारतात आल्यानंतर ही मंदिरे पाडून त्यांचे मशिदीत रूपांतर करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. २००० पर्यंत त्यांनी कुतुबमिनारच्या आत देवाच्या आरतीत सहभाग नोंदवला आहे.
पारंपरिक पूजेची मागणी
त्यामुळे मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे पारंपरिक पूजा व आरती सुरू करावी, अशी मागणी पारंपरिक पुजाऱ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
‘उलटा गणेश’ मूर्तीवरून वाद
पूजा सिंग यांच्या आधी भाजप नेते तरुण विजय यांनीही कुतुबमिनारमध्ये उलटी ठेवलेली गणेश मूर्ती आणि पिंजऱ्यात ठेवलेल्या आणखी एका मूर्तीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत तरुण विजय यांनी सांगितले होते की, मी स्वतः कुतुबमिनारला अनेकदा भेट देऊन मी स्वतः गणेश मूर्तीबद्दल पाहिले आहे, त्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीने मूर्ती ठेवण्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित बातम्या
Nashik Murder | नाशकात बकरा व्यापाऱ्याचा निर्घृण खून, लाल ओढणीत गुंडाळलेले बारा लाख गायब!
Maha Minister: 11 लाखांच्या पैठणीवरून वाद; आदेश बांदेकरांना नेटकरी म्हणाले, “ही साडी नेसून..”